कुठे रुबाब, कुठे कबाब… मलिकांच्या पत्रकार परिषदांवरुन शेलारांचा टोला, तर संजय राऊतांना युतीबाबत आवाहन!
भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही मलिकांवर जोरदार हल्ला चढवलाय. महत्वाची बाब म्हणजे शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना युतीच्या मुद्द्यावरुन चुचकारलं आहे. एका दिवाळी अंकाच्या कार्यक्रमात बोलताना शेलार यांनी युतीबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदांवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर जोरदार टीका केलीय. त्यानंतर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही मलिकांवर जोरदार हल्ला चढवलाय. महत्वाची बाब म्हणजे शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना युतीच्या मुद्द्यावरुन चुचकारलं आहे. एका दिवाळी अंकाच्या कार्यक्रमात बोलताना शेलार यांनी युतीबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. (Ashish Shelar criticizes Nawab Malik and appeals to Sanjay Raut about alliance)
एकीकडे भाजप नेते आता शिवसेनेसोबत युतीचा विचार नाही. आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढून महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणण्याचे वक्तव्य करत आहेत. तर दुसरीकडे येणाऱ्या काळात भागवा बॉम्ब फोडा, असं आवाहनहच शेलार यांनी राऊतांना केलंय. राऊत साहेब पत्रकारांना नोबेल मिळाला आहे. मात्र, राऊत साहेब ज्यांच्या हातात कायदा सुव्यवस्था आहे त्यांनी पत्रकारांना नोबेल सारखं वागवू नये. कभी-कभी मुझे ऐसे लगता है इस आदमी का क्या करें, असा मिश्किल टोलाही शेलारांनी लगावलाय.
‘कुठे रुबाब आणि कुठे कबाब’
तुम्ही, राष्ट्रवादी एक आहात हे ठीक आहे. मात्र तिसरे मित्र जे आहेत ते योग्य दिसत नाहीत. एकत्र मिळून चुका सुधारू, हा आमचा प्रस्ताव नाही तर हे मनोगत आहे, असं आवाहनच शेलार यांनी यावेळी राऊतांना केलंय. त्याचबरोबर संजय राऊत तुमची सकाळची वेळ आता वेगळ्या व्यक्तींनी घेतली आहे. मात्र, इतरांसोबत तुलना होऊ शकत नाही. कारण सकाळ सकाळ कबाब बरोबर वाटत नाही. कुठे रुबाब आणि कुठे कबाब, अशा शब्दात शेलार यांनी नवाब मलिकांना जोरदार टोला हाणलाय.
आशिष शेलारांकडून आघाडीचा पंचनामा
दादरमध्ये आज भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी आशिष शेलार यांनी “राजकारणाचे गुन्हेगारीकरण” या विषयावर आपले विचार मांडले. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या दोन वर्षांच्या कालखंडाचा पंचनामा करत हे सरकार महाराष्ट्र धर्म आणि हिंदू विरोधी असल्याची खरमरीत टीका केली. ठाकरे सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर पहिल्यांदा नागरिकांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्यात आला. त्यानंतर आणीबाणी सारखी अघोषित परिस्थिती निर्माण केली गेली. त्यानंतर मात्र ठाकरे सरकारच्या दोन वर्षांचे वर्णन करायचे झाले तर प्रथम गुन्हयांचे समर्थन करण्यात आले. तर पुढच्या टप्प्यात गुन्हेगारांचे समर्थन करण्यात आले. त्यानंतर आतंकवादाचे समर्थन करण्यात आले. नंतर फुटीरतावाद्यांचेही समर्थन करण्यात आले आणि आता चौथ्या टप्प्यात ठाकरे सरकारकडून अराजकतावाद्यांचे समर्थन आणि संरक्षण करण्यात येते आहे, असा आरोप शेलार यांनी केला.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठकीत प्रस्ताव मांडताना आमदार आशीष शेलार https://t.co/59G4xgUYJN
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 16, 2021
इतर बातम्या :
नवाब मलिकांचा पुन्हा एकदा समीर वानखेडेंवर निशाणा; आता मलिकांकडून गोसावीच्या ऑडिओ क्लिप उघड
Ashish Shelar criticizes Nawab Malik and appeals to Sanjay Raut about alliance