Ashish Shelar : भाजप आमदार आशिष शेलार यांना 1 लाखाचा ऑनटेबल जामीन, गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव
पेडणेकर यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आज आशिष शेलार यांनी जामीनासाठी अर्ज केला. त्यानंतर शेलार यांना 1 लाखाचा ऑनटेबल जामीन मंजूर केला आहे. इतकंच नाही तर शेलार यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेत महापौरांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे.
मुंबई : एका आक्षेपार्ह वक्तव्यावरुन महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) आणि भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यातील वाद आता पोलिस ठाणे आणि न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. पेडणेकर यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आज आशिष शेलार यांनी जामीनासाठी अर्ज केला. त्यानंतर शेलार यांना 1 लाखाचा ऑनटेबल जामीन मंजूर केला आहे. इतकंच नाही तर शेलार यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेत महापौरांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे.
‘जी केस बनूच शकत नाही ती केस बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आम्ही कायदा सुव्यवस्था मानणारे आहोत, न्यायिक व्यवस्थेला मानणारे आहोत. त्यामुळे खोटा का होईना गुन्हा त्यांनी काल दाखल केला त्याबद्दल मी जामीन घेतला. त्याबरोबरीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा एफआयआर क्वॅश केला पाहिजे, यासाठी मि क्वॅशिंग पिटिशनही दाखल केलं आहे. त्याची कॉपीही पोलिस ठाण्यात दिली आहे. न्यायिक व्यवस्थेतून सत्य मी बाहेर आणेन, पण यांना पुन्हा सांगू इच्छितो की, आम्ही सगळे सहकारी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणाविरोधात संघर्ष अजून कडवा करु. तुम्ही जेवढा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कराल, भारतीय जनता पार्टी तो आवाज अजून उचलेल आणि तुमची कू कृत्य जनतेसमोर उघड करु’, असा इशारा शेलार यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला दिलाय.
I moved Hon.High Court via Writ Petition No.19100 to quash the false criminal case foisted against me by this vindictive Thackeray Sarkar which is seeking to silence my voice exposing corruption & injustice being done to Mumbaikars!
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 9, 2021
फडणवीसांकडून शेलारांचं समर्थन
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devedndras Fadnavis) यांनी शेलारांची पाठराखण केलीय. आशिष शेलार महिलांचा अवमान करूच शकत नाहीत. महापौरांविषयी तर अजिबातच नाही. त्यांच्या प्रेसनोटचा, वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला. महापौरांबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे, असं ते म्हणालेत. ते शिवसेनेच्या विरोधात सातत्यानं बोलतात, म्हणूनच त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय.
भाजपाचा कुठलाही नेता कोणत्याही महिलेबद्दल अपशब्द वापरूच शकत नाही. महापौरांबद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे. आशीष शेलार @ShelarAshish शिवसेनेविरुद्ध आक्रमक बोलतात, त्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला का, हा प्रश्न आहेच. नागपूर येथे माध्यमांशी संवाद… pic.twitter.com/60F9oN6wpA
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 9, 2021
पेडणेकरांकडून गुन्हा दाखल
किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी रात्री किशोरी पेडणेकर यांनी मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात जात जबाब नोंदवला. त्यानंतर शेलार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. त्यामुळे वरळी सिलिंडर ब्लास्ट प्रकरणावरुन सुरु झालेला हा वाद आता अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेलारांचं वक्तव्य अवमानकारक- चाकणकर
भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौरांबाबत केलेलं वक्तव्य अवमानकारक असल्याची प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिलीय. मुंबईच्या मरीन लाइन्स पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईच्या पोलीस आयुक्तांना या संदर्भातला सत्यस्थिती अहवाल मागितला आहे. त्यानुसार गरज भासल्यास आरोपीला अटक करण्यात यावी, असे निर्देश दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
इतर बातम्या :