काँग्रेसला सरकारमध्ये इज्जत नाही, आधी जनतेने झिडकारलं, आता महाविकास आघाडी : आशिष शेलार

आशिष शेलार यांनी औरंगाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर निशाणा साधला (Ashish Shelar slams congress).

काँग्रेसला सरकारमध्ये इज्जत नाही, आधी जनतेने झिडकारलं, आता महाविकास आघाडी : आशिष शेलार
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 3:57 PM

औरंगाबाद : “काँग्रेसला सरकारमध्ये इज्जत नाही हे पूर्ण सत्य आहे. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी पायपीट करावी लागते. काँग्रेसला आधी जनतेने झिडकारलं, त्यानंतर आता महाविकास आघाडीनेही झिडकारलं”, अशी खोचक टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारानिमित्ताने शेलार आज (19 नोव्हेंबर) औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. दरम्यान, औरंगाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला (Ashish Shelar slams congress).

“वीजबिलाचा मुद्दा हा आमचा आहे. आमच्या मुद्द्यावर मनसे आंदोलन करत आहे. महाविकास आघाडीने लबाडी केली. याला जनता कधीच माफ करणार नाही. वीजबिलात आधी सवलत देऊ म्हणणाऱ्या नेत्यांना पक्षातील नेत्यांनीच किंमत दिली नाही. त्यामुळे त्यांना हे विधान करावं लागतं. आम्ही चेतावणी देऊ, झोपडीत राहणाऱ्याला जास्त बिल कसं येतं? याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल, आम्ही पाठ सोडणार नाही”, असा घणाघात शेलार यांनी केला.

“तुमच्या झेंड्याची शुद्धीकरण करण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्यवीर सावकरांची बदनामी करणाऱ्या पक्षासोबत ते गेले. त्यांनी आता शुद्धीकरण केलं पाहिजे”, असा खोचक सल्ला आशिष शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे. त्याचबरोबर “आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपचा भगवा झेंडा फडकेल. विकासाच्या वाटेवर जाणं अपेक्षित आहे”, असं आशिष शेलार म्हणाले.

दरम्यान, मराठवाडा पदवीधर संघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भाजप नेते जयसिंगराव गायकवाड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. “भाजपला पराभूत करण्यासाठीच मी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेत आहे. भाजप हा पक्ष सध्या हवेत गेला आहे. ते सध्या विमानापेक्षाही जास्त उंचीवर आहेत. मात्र, आता मी भाजपला धडा शिकवणार आहे, त्यासाठी भाजपने तयार राहावे”, असा इशारा जयसिंगराव गायकवाड यांनी दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यालादेखील आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“ज्यांना पक्षाने इतक्या उंचीवर नेलं त्यांनी पक्षाच्या उंचीबाबत बोलू नये. पक्षाने जे देता आलं ते दिल. मात्र, यापुढे अपशब्द वापरला तर आम्ही शांत बसणार नाही”, असं प्रत्युत्तर आशिष शेलार यांनी दिलं (Ashish Shelar slams congress).

“औरंगाबादेत 1680 कोटींचा पाणी योजना मंजूर केली. मात्र सरकार बदलल्याने अंमलबजावणी थांबली. रस्त्यासाठी 125 कोटी, घनकचरासाठी 80 कोटी, वॉटर ग्रीडसाठी गती देण्याच काम केलं. मात्र, ठाकरे सरकारने मराठवाड्याच्या जनतेवर अन्याय करण्याच काम केलं”, अशीदेखील टीका त्यांनी यावेळी केली.

महाविकास आघाडीच पुन्हा मतभेद?

महसलूमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नगरविकास खात्याकडून काँग्रेसच्या नगर पालिका आणि महानगर पालिकांना निधी कमी मिळाला असल्याचे सांगितले. मात्र, आगामी अर्थसंकल्पात ही त्रुटी दूर केली जाईल, असंही थोरात म्हणाले. आमच्याकडे असलेल्या खात्यांवरील अन्यायाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील काही दिवसांपूर्वी काँग्रेच्या महापालिकांना निधी मिळत नसल्याचे म्हटले होते.

संबंधित बातम्या :

आमच्या खात्यांवर अन्याय होतोय ही आमची भावना, काँग्रेसची पुन्हा खदखद

भाजप हा मस्तीत आलेला पक्ष, त्यांना धडा शिकवणार, जयसिंगराव गायकवाड यांचा एल्गार

आम्ही विधान परिषदेच्या सहाच्या सहा जागा जिंकणार, कुणी पलायन केलं तरी पक्षाला फरक पडत नाही : चंद्रकांत पाटील

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.