Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसचा भूखंडाचं श्रीखंड खाण्याचा डाव, मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना आरेच्या जागेसाठी वचन द्यावं : आशिष शेलार

आरे कारशेडच्या जागेवरुन सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळत आहे (Ashish Shelar slams Maharashtra Government on Aarey carshed land).

काँग्रेसचा भूखंडाचं श्रीखंड खाण्याचा डाव, मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना आरेच्या जागेसाठी वचन द्यावं : आशिष शेलार
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 6:49 PM

मुंबई : आरे कारशेडच्या जागेवरुन सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळत आहे. आरे कारशेडच्या जागेवरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. “काँग्रेसचा आरेच्या भूखंडाचा श्रीखंड खाण्याचा डाव 2014 सालीच होता. पण तो डाव नंतर सत्तेत आलेल्या भाजप सरकारने हाणून पाडला”, असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे (Ashish Shelar slams Maharashtra Government on Aarey carshed land).

“आरेच्या कारशेडचा भूखंड नाममात्रदराने एमएमआरडीएला व्यवसायिक वापरासाठी द्यावा, असा निर्णय 3 मार्च 2014 रोजी तत्कालीम मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला होता. हा निर्णय नंतर सत्तेत आलेल्या भाजप सरकारने हाणून पाडला”, असा दावा शेलार यांनी केला.

“आरेच्या भूखंडाचा वापर कोणत्याही व्यवसायिक कामासाठी न करता मेट्रो कारशेडसाठी करावा, असा निर्णय भाजप सरकारने घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेऊन व्यवसायिक वापराच्या निर्णयाला प्रतिबंध केला. हे देवेंद्र फडणवीस यांचं काम आहे”, असं आशिष शेलार म्हणाले.

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वचन द्यावं’

“खरंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना आज वचन देण्याची वेळ आली आहे. कारण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना चर्चेला बोलावलं तर ते यायला तयार नाहीत. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण व्यवसायिक वापराची गोष्ट करत आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी आरेच्या जागेवर कोणत्याही प्रकारच्या कमर्शिअल गोष्टी केल्या जाणार नाहीत, असं वचन द्यावं”, असं शेलार म्हणाले.

सचिन सावंतांवर टीका

“आरेची जागा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला व्यावसायिक वापरासाठी उपयोगात आणायची होती, असा आरोप करुन काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी अज्ञानाचे पुन्हा एकदा प्रदर्शन करीत, अतिशहाणपणाचा भाग-2 सादर केला आहे”, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला (Ashish Shelar slams Maharashtra Government on Aarey carshed land).

“सावंत यांनी आता हे सारे बोलून महाराष्ट्राचे विद्यामान मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांना पण संशयाच्या भोवऱ्यात आणले आहे. कारशेड स्थलांतरीत करुन आरेतील जागेचा वापर अन्य गोष्टींसाठी करणार असे सागणारे विद्यमान मुख्यमंत्री, या जागेचा वापर नेमका कशासाठी करणार? की सत्तेतील पार्टनर असलेल्या काँग्रेसला हा भूखंड खाण्यासाठी मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री मदत करणार?”, असे खोचक सवाल आशिष शेलार यांनी केले.

हेही वाचा : शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही हा राणेंचा विनोद, त्यांनी आत्मपरीक्षण करावं, उदय सामंत यांचा निशाणा

राज ठाकरेंकडे झोलरांनी अनेकदा भीक..संदीप देशपांडेंचा BJP नेत्यावर टीका
राज ठाकरेंकडे झोलरांनी अनेकदा भीक..संदीप देशपांडेंचा BJP नेत्यावर टीका.
त्यांना राग आला म्हणजे कुणाल कामरा खरं बोलला.., अंबादास दानवेंची टीका
त्यांना राग आला म्हणजे कुणाल कामरा खरं बोलला.., अंबादास दानवेंची टीका.
एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणणारा कुणाल कामरा नेमका आहे तरी कोण?
एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणणारा कुणाल कामरा नेमका आहे तरी कोण?.
कोण गद्दार आणि कोण खुद्दार हे जनतेने दाखवून दिलं आहे - मुख्यमंत्री
कोण गद्दार आणि कोण खुद्दार हे जनतेने दाखवून दिलं आहे - मुख्यमंत्री.
माझ्याकडे बंदूक...,माजी आमदाराच्या मुलाची धमकी, सरकारी अधिकारीही भिडला
माझ्याकडे बंदूक...,माजी आमदाराच्या मुलाची धमकी, सरकारी अधिकारीही भिडला.
कुणाल कामराची करामत अन् शिवसेना आक्रमक, शिंदेंवरील 'या' गाण्यामुळं वाद
कुणाल कामराची करामत अन् शिवसेना आक्रमक, शिंदेंवरील 'या' गाण्यामुळं वाद.
'मुंबई पोलीस आयुक्तांची बदली झाली पाहिजे..', संजय राऊतांचा टोला
'मुंबई पोलीस आयुक्तांची बदली झाली पाहिजे..', संजय राऊतांचा टोला.
'ते कधी निवडून...', राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अजितदादांचा खोचक टोला
'ते कधी निवडून...', राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अजितदादांचा खोचक टोला.
कल्याणात श्रेयावरून सेनेतच राडा, महिला कार्यकर्ता - माजी नगरसेवकात वाद
कल्याणात श्रेयावरून सेनेतच राडा, महिला कार्यकर्ता - माजी नगरसेवकात वाद.
शिंदेंवरील गाण्यामुळे वाद, कामराला शिवसैनिकांची शिवीगाळ, क्लिप व्हायरल
शिंदेंवरील गाण्यामुळे वाद, कामराला शिवसैनिकांची शिवीगाळ, क्लिप व्हायरल.