नाणारचा रिफायनरी प्रकल्प पाकिस्तानात? उद्धव ठाकरे यांची पाकला मदत; आशिष शेलार यांचा आरोप

कोकणातील नाणार येथे होणारा देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करत आहे. या प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्कोने या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे.

नाणारचा रिफायनरी प्रकल्प पाकिस्तानात? उद्धव ठाकरे यांची पाकला मदत; आशिष शेलार यांचा आरोप
ashish shelar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 3:40 PM

मुंबई | 29 जुलै 2023 : नाणार येथील रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा एकदा भाजप आणि ठाकरे गटामध्ये जुंपण्याची शक्यता आहे. नाणार येथील रिफायनरी प्रकल्प पाकिस्तानला जाणार असल्याचं वृत्त आहे. त्यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. नाणार प्रकल्प पाकिस्तानला जात आहे. उद्धव ठाकरे यांनी सातत्याने विरोध केल्यामुळे महाराष्ट्र आणि देशाचं कोट्यवधीचं नुकसान झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी नाणारला विरोध करून एकप्रकारे पाकिस्तानलाच मदत केली आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

कोकणातील नाणार येथे होणारा देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प आपल्याला मिळावा म्हणून पाकिस्तान प्रयत्न करत आहे. या प्रकल्पात सर्वात मोठी गुंतवणूक असलेल्या सौदी अराम्कोने या तेल कंपनीने आता पाकिस्तानातील ग्वादर शहराची निवड केली आहे. 10 अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर पाकिस्तान आणि सौदी अरेबियाने स्वाक्षरी केल्याची बातमी वृत्तपत्रात आली आहे, असं आशिष शेलार म्हणाले.

त्या शक्ती तर आंदोलनात नव्हत्या?

गेली सहा वर्षे नाणार येथे रिफायनरीला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी कोकण, महाराष्ट्र आणि देशाचे कोट्यवधीचे नुकसान केले? प्रकल्प भारताला मिळू नये म्हणून ज्या आंतरराष्ट्रीय शक्ती काम करतात त्या नाणार विरोधी आंदोलनात सहभागी तर नव्हत्या? देश विरोधी आंतरराष्ट्रीय शक्तींशी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची हातमिळवणी तर नव्हती? उद्धव ठाकरे नाणारला विरोध करुन सरळ सरळ पाकिस्तानला मदत केली?, असा आरोपच शेलार यांनी केला.

हे सुद्धा वाचा

स्थानिकांना विश्वासात घ्या

राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनीही त्यावर भाष्य केलं आहे. राज्यात प्रकल्प यावेत हे क्रमप्राप्त आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पामध्ये स्थानिकांना विश्वासात घ्यायला हवं. स्थानिकांच्या मनातल्या शंका त्यांनी दूर केल्या पाहिजेत. त्यानंतर बारसू प्रकल्प करण्यास काही हरकत नसावी. स्थानिकांनी सरकार काय बाजू मांडते हे समजून घ्यावं.

सरकारची बाजू ग्रामस्थांना पटली तर प्रकल्पाचा मार्ग सुकर होऊ शकतो, असं सुनील तटकरे यांनी सांगितलं. मी दिल्लीत जाईन तेव्हा रत्नागिरी प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करेल. हा प्रकल्प सुरू राहणे आवश्यक आहे. बारसू रिफायनरीकडे राजकीय दृष्ट्या न पाहता, इथल्या ग्रामस्थांच्या मनातील शंकेचे निरसन करणे ती सर्व पक्षांची जबाबदारी, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.