मराठा आरक्षण कायदा फुलप्रुफ होता तर सर्वोच्च न्यायालयात टिकला का नाही?; अशोक चव्हाणांचा फडणवीसांना सवाल

मराठा आरक्षण कायदा इतका फुलप्रुफ होता तर सर्वोच्च न्यायालयात टिकला का नाही?, असा सवाल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला. (Ashok Chavan slams devendra fadnavis on maratha reservation)

मराठा आरक्षण कायदा फुलप्रुफ होता तर सर्वोच्च न्यायालयात टिकला का नाही?; अशोक चव्हाणांचा फडणवीसांना सवाल
काँग्रेस नेते अशोक चव्हाण
Follow us
| Updated on: Dec 15, 2020 | 5:51 PM

मुंबई: मराठा आरक्षण कायदा फुलप्रुफ आहे. या कायद्याला कोणताही अडथळा येणार नाही, असं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते. हा कायदा इतका फुलप्रुफ होता तर सर्वोच्च न्यायालयात टिकला का नाही?, असा सवाल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी फडणवीस यांना केला. (Ashok Chavan slams devendra fadnavis on maratha reservation)

विधानसभेत पुरवणी मागण्यांवर सुरू असलेल्या चर्चेत भाग घेताना अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना हा सवाल केला. फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी फुलप्रुफ कायदा आणू म्हणून सांगितलं होतं. या कायद्यामुळे काहीच अडचण येणार नसल्याचा दावाही त्यांनी केला होता. तुमचा कायदा एवढाच फुलप्रुफ होता तर सर्वोच्च न्यायालयात तो टिकला का नाही? असा सवाल करतानाच आम्ही तर तुम्ही आणलेला आरक्षण कायदा मान्य केला. त्यावर चर्चाही केली नाही आणि आक्षेपही घेतला नव्हता, असं चव्हाण म्हणाले.

मराठा आरक्षणाचा सोक्षमोक्ष लावणार

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने नेमलेलेच वकील सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत. एकूण नऊ ते दहा निष्णांत वकील हा खटला लढवत आहेत. पण काही ना काही मुद्द्यांवर विषय अडत आहे. पण आम्हीही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. आता या प्रकरणावर कोर्टात दररोज सुनावणी होणार असून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मराठा आरक्षणावरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न

सरकार कुणाचं आहे हे महत्त्वाचं नाही. आपण सर्वांनी मिळून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कंबर कसली पाहिजे. आजच्या परिस्थितीत काय केलं पाहिजे याचा सर्वांनीच विचार केला पाहिजे, असं सांगतानाच काही लोक मात्र गोबेल्स नीती वापरून मराठा आरक्षणावरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

ओबीसींचं आरक्षण कायम राहील

यावेळी त्यांनी ओबीसींचं आरक्षण कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं. ओबीसी आरक्षणाबाबत काही वेगळा विचार नाही. या आरक्षणात काही फरक पडणार नाही. पण काही लोक ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विधानपरिषदेच्या निकालानंतर खासकरून मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण निर्माण केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Ashok Chavan slams devendra fadnavis on maratha reservation)

संबंधित बातम्या:

मराठा तरुणांसाठी टोकाचा संघर्ष करू, आझाद मैदानात फडणवीसांचा एल्गार

LIVE UPDATES : आ बैल मुझे मार अशी सरकारची सुप्रीम कोर्टातील भूमिका : देवेंद्र फडणवीस

(Ashok Chavan slams devendra fadnavis on maratha reservation)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.