चंद्रकांत पाटलांनी निर्माण केलेले खड्डेच बुजवतोय; अशोक चव्हाणांचा टोला

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. चंद्रकांतदादांनी मागच्या काळात निर्माण केलेले खड्डेच बुजवतोय, असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटलांनी निर्माण केलेले खड्डेच बुजवतोय; अशोक चव्हाणांचा टोला
Follow us
| Updated on: Oct 31, 2020 | 10:29 AM

परभणी: राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. चंद्रकांतदादांनी मागच्या काळात निर्माण केलेले खड्डेच बुजवतोय, असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला आहे. (ashok chavan taunt chandrakant patil over potholes in maharashtra)

प्रसारमाध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं. मी चंद्रकांत पाटलांसारखी तारीख पे तारीख देणार नाही. आल्यापासून त्यांनी निर्माण केलेले खड्डे बुजवतोय. दुसरं कामच उरलेलं नाही. हे खड्डे दिसावेत आणि ते तात्काळ बुजवून घेता यावेत म्हणून विमानाऐवजी गाडीनेच फिरत असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी काँग्रेसकडे असलेल्या पालिकांना निधी मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

काँग्रेसच्या ताब्यातील महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नसल्याचं सांगत चव्हाण यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आघाडीत अजूनही बिघाडी असून काँग्रेस सत्तेत असूनही नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, चव्हाणांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी सारवासारव केली आहे. चव्हाणांचं ते वक्तव्य हे युती सरकारच्या मुख्यमंत्र्यांबाबतचं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात काँग्रेसच्या ताब्यातील पालिकांना निधी मिळत नसल्याचं चव्हाण यांना म्हणायचं आहे, असं ठाकरे म्हणाले. फडणवीस सरकार पालिकांना निधी देत नाही. त्यामुळे आपल्याला शिवसेनेसोबत सत्तेत जाण्याशिवाय पर्याय नाही हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पटवून द्यावं लागल्याचं सांगण्यासाठी चव्हाण यांनी ते वक्तव्य वापरलं, असं सांगतानाच आघाडी सरकारमध्ये चांगला समन्वय असून कोणतीही नाराजी नसल्याचंही त्यांनी सांगितलं. (ashok chavan taunt chandrakant patil over potholes in maharashtra)

संबंधित बातम्या:

दिल्लीतील नेते शिवसेनेसोबत जाण्यास अनुकूल नव्हते: अशोक चव्हाण

नवी मुंबईत परवानगीशिवाय वृक्षतोड केल्यास कारवाई, थेट गुन्हा दाखल होणार

राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो तर मराठा आरक्षणाचा का नाही?; अशोक चव्हाणांचा थेट सवाल

(ashok chavan taunt chandrakant patil over potholes in maharashtra)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.