बदरुद्दीन अजमलची आणखी एका लग्नाची इच्छा, मुख्यमंत्री म्हणाले आताच करुन घे नंतर तुला…
"मी नाही, पण काँग्रेस नेते रकीबुल हुसैन म्हणाले की, मी म्हातारा झालोय. पण मी अजूनही लग्न करु शकतो. सीएमनी रोखलं, तरीही मी लग्न करु शकतो. माझ्यामध्ये तितकी हिम्मत आहे"

ऑल इंडिया यूनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे प्रमुख बदरुद्दीन अजमल यांनी आणखी एका लग्नाची इच्छा व्यक्त केली. त्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी पलटवार केलाय. अजमल यांची लग्न करण्याची योजना असेल, तर त्यांनी निवडणुकीआधी लग्न करुन घ्याव. कारण निवडणुकीनंतर एकापेक्षा जास्त लग्न केल्यास तुरुंगात पाठवल जाईल, असं हिमंत बिस्व सरमा म्हणाले. AIUDF चीफ बदरुद्दीन अजमल म्हणाले की, ‘मी अजून म्हातारा झालेलो नाही. दुसर लग्न सुद्धा करु शकतो’
काँग्रेस नेते रकीबुल हुसैन यांच्या वक्तव्यावर बदरुद्दीन अजमल म्हणाले की, “मी नाही, पण काँग्रेस नेते रकीबुल हुसैन म्हणाले की, मी म्हातारा झालोय. पण मी अजूनही लग्न करु शकतो. सीएमनी रोखलं, तरीही मी लग्न करु शकतो. माझ्यामध्ये तितकी हिम्मत आहे” अजमल यांच्या वक्तव्यावर हिमंत सरमा म्हणाले की, ‘जर ते निवडणुकीआधी वधू घेऊन आले, लग्न केलं तर ठीक आहे’
त्यांनी लग्नाला बोलावल, तर आम्ही जाऊ
“बदरुद्दीन अजमल यांनी बोलावल तर आम्ही सुद्धा जाऊ. कारण अजूनपर्यंत हे बेकायदेशीर नाहीय. माझ्या माहितीनुसार, त्यांची एक पत्नी आहे. ते दोन किंवा तीन लग्न करु शकतात. पण निवडणुकीनंतर आम्ही बहुविवाह बंद करणार आहोत. संपूर्ण ड्राफ्ट तयार झालाय. त्यांनी बोलावल तर आम्ही जाऊ. पण निवडणुकीनंतर हे बेकायद होईल. मी हे थांबवत नाहीय. पण हा कायदा आहे. कायद्यासोबत कोणी खेळेल, तर कायदेशीर पाऊल उचलू” असं हिमंत सरमा म्हणाले. एआययूडीएफ पार्टीचे प्रमुख बदरुद्दीन अजमल यांच वय 74 पेक्षा जास्त आहे. त्यांनी स्वत:ला ‘बलवान अजमल’ म्हटलं होतं.