CM Sarma : आसाम बनतोय जिहादींचा अड्डा, मदरशातील शिक्षणावर लक्ष ठेवण्याचे मुख्यमंत्री सरमा यांचे आवाहन
आसामचे मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या काही महिन्यात बांग्लादेशातील दहशतवादी संघटन अंसारुल इस्लामचे पाच मॉड्यूलचा पर्दापाश केला.
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा गुरुवारी म्हणाले, राज्यात जिहादींच्या हालचाली वाढत आहेत. गेल्या काही महिन्यात बांग्लादेशातील (Bangladesh) दहशतवादी (Terrorist) संघटन अंसारूल इस्लामच्या पाच मॉड्यूलचा पर्दापाश केला. सरमा म्हणाले, अंसारुल इस्लामशी संबंधित सहा बांग्लादेशी नागरिक, युवकांना घेऊन आसाममध्ये आले. त्यापैकी एकाला मार्चमध्ये बारपेटा येथे पहिल्या मॉड्युलचा पर्दापाश झाल्यानंतर अटक करण्यात आली. त्यांनी सांगितलं की, आसामच्या बाहेर इमाम मुस्लीम युवकांना खासगी मदरशात शिक्षणाच्या (Study) नावावर वेगळंच काहीतरी शिकवलं जातं. मुख्यमंत्री म्हणाले, जिहादी घटना या दहशतवादी घटनांपेक्षा खूप वेगळ्या आहेत. कित्तेक वर्षांपासून या सुरू आहेत. याशिवाय जिहादी घटना या इस्लामी कट्टरवादात सक्रिय सहभागी होतात. यामुळं विध्वंस केला जातो.
मदरशांबाबत मुख्यमंत्री सरमा म्हणाले…
आसाममध्ये 2016-17 ला अवैध प्रवेश करणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांनी कोविड दरम्यान, काही प्रशिक्षण शिबिर घेतली. यात फक्त एका बांग्लादेशीला अटक करण्यात आली आहे. राज्याबाहेरील कोणीही मदरशात शिक्षक किंवा इमाम बनत असेल तर याची सूचना स्थानिक पोलिसांना द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री सरमा यांनी केली. आसाममध्ये यापूर्वी 800 मदरसे बंद करण्यात आले. तरीही आता कौमी मदरशांची संख्या खूप आहे. मी नागरिकांना आवाहन करतो की, मदरशांवर लक्ष ठेवा. मदरशांत काय आणि कोणते विषय शिकविले जातात, यावर नजर ठेवा.
बीएसएफच्या अधिकारावर बोलले मुख्यमंत्री
मोरीगाव येथे गुरुवारी जामीउल दुदा मदरसा आपत्ती व्यवस्थापन नियमानुसार पाडण्यात आलं. तेथे शिकणाऱ्या 43 विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत शिफ्ट करण्यात आले. बांग्लादेशी दहशतवादी संघटनेशी जुळलेले अलकायदा मॉड्यूलचे प्रमुख मुफ्ती मोहम्मद याला अटक करण्यात आली. मुफ्ती मोहम्मदला भोपाळमध्ये 2017 साली इस्लामिक लॉमध्ये डॉक्टरेट देण्यात आलीय. याशिवाय बीएसएफच्या अधिकार क्षेत्रातील वाढत्या मागणीवर त्यांनी विचार मांडले. ते म्हणाले, बीएसएफच्या अधिकार क्षेत्राला वाढविण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. आम्ही बीएसएफला शक्य ती मदत करू. आम्ही केंद्रीय एजन्सींशी मिळून काम करत आहोत.