Assembly Election Results : काँग्रेस श्रीरामाच्या चरणी, निकालापूर्वी हनुमान अन् श्रीराम बनले काँग्रेस कार्यकर्ते

assembly election Results 2023 | नवी दिल्लीत काँग्रेस कार्यालयात जल्लोष सुरु झाला आहे. काँग्रेसचे कार्यकर्ता भगवान श्रीराम आणि हनुमानाचे रुप घेऊन नवी दिल्लीतील कार्यालयात पोहचले आहे. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

Assembly Election Results :  काँग्रेस श्रीरामाच्या चरणी, निकालापूर्वी हनुमान अन् श्रीराम बनले काँग्रेस कार्यकर्ते
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 12:10 PM

नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली. निकालापूर्वी काँग्रेस कार्यालयाबाहेर जल्लोष सुरु झाला आहे. काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते पूजाअर्चा करत आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते भगवान श्रीराम आणि हनुमानाचे रुप घेऊन नवी दिल्लीतील कार्यालयात पोहचले आहे. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत श्रीराम आणि हनुमानाच्या रुपाची आरती करताना काँग्रेस नेते दिसत आहेत. यावेळी सर्व देवातांचा जयजयकार केला जात आहे. राहुल गांधी जिंदाबाद अशा घोषणाही कार्यकर्ते देत आहे.

काँग्रेस कार्यालयात आणले लाडू

काँग्रेस मुख्यालयाच्या बाहेर आतापासूनच लाडू आणले गेले आहे. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी तोंड गोड करायला सुरुवात करण्यात आली आहे. काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत विजयाचा आत्मविश्वास आहे. यामुळे सकाळपासूनच मोठी गर्दी काँग्रेस मुख्यालयाच्या बाहेर दिसत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला आहे. प्रथमच काँग्रेस कार्यालयाबाहेर श्रीराम आणि हनुमानाचे बॅनर लागले आहे. यामुळे लोकसभेच्या सेमीफायनलमध्ये काँग्रेस हिंदुत्वाच्या मार्गावरुन लोकसभेच्या फायनलमध्ये जाणार असल्याचे दिसून येत आहे.

काँग्रेसकडून पुन्हा रिसॉर्ट पॉलिसी

काँग्रेसकडून पुन्हा रिसॉर्ट पॉलिसी करण्यात आली आहे. चार राज्यांतील निवडून आलेल्या आमदारांना एकत्र बोलावले जाणार आहे. सर्व आमदारांना एकाच रिसॉर्टमध्ये ठेवण्याचे आदेश काँग्रेस हायकमांडकडून देण्यात आली आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर काँग्रेसकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. चार राज्यातील आमदारांना राजस्थानमध्ये आणले जाण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशात भाजपचे सरकार आहे. तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. तेलंगणात बीआरएसची सत्ता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये कांट्टे की टक्कर आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.