Assembly Election 2023 | पंजाबमध्ये चमत्कार करणाऱ्या ‘आप’ला चार राज्यांत किती जागा?

Assembly Election 2023 | पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विविध पक्ष मैदानात उतरले होते. चार पैकी तीन राज्यांत भाजपची सरकार सत्तेवर आली. काँग्रेसला तेलंगणात सत्ता मिळाली. पण आम आदमी पक्षाला २०२२ सारखी कामगिरी करता आली नाही. २०० जागांवर उमेदवार उभे केल्यानंतरही...

Assembly Election 2023 | पंजाबमध्ये चमत्कार करणाऱ्या 'आप'ला चार राज्यांत किती जागा?
ARVIND KEJARIWALImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 3:15 PM

नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : पाच राज्यांपैकी चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहे. या चार पैकी तीन राज्यांत भाजपचे सरकार बनणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार येणार आहे. तेलंगणात प्रथमच काँग्रेसचे सरकार येणार आहे. २०२२ मधील विधानसभा निवडणुकीत चमत्कार करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची कामगिरी कशी राहिली? यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या आम आदमी पक्ष दिल्ली आणि पंजाबात सत्तेत आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी धडाकेबाज प्रचार केला. अनेक रॅल्या काढल्या. रोड शो केले. एकूण २०० पेक्षा जास्त जागा ‘आप’ने लढवल्या होत्या. परंतु एकाही ठिकाणी ‘आप’ला यश मिळले नाही.

पाणी आणि वीज मोफत देण्याची घोषणा, पण…

दिल्ली आणि पंजाबमध्ये सरकार बनल्यानंतर हिंदी बेल्टमध्ये म्हणजे राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी ‘आप’ने विधानसभा निवडणूक लढवली. मध्य प्रदेशात 70 पेक्षा जास्त ठिकाणी निवडणूक रिंगणात आप उतरली. तसेच राजस्थानमध्ये 88 तर छत्तीसगडमध्ये 57 ठिकाणी ‘आप’ने उमेदवार उभे केले. दिल्ली आणि पंजाबप्रमाणे या राज्यांमध्ये मोफत पाणी आणि वीज देण्याची घोषणा दिली. परंतु एकाही ठिकाणी ‘आप’चा उमेदवार विजयी होऊ शकला नाही.

किती मते मिळाली

अनेक ठिकाणी ‘आप’च्या उमेदवारांची अमानत रक्कम जप्त झाली आहे. सिंगरौलीच्या नगराध्यक्ष राणी अग्रवाल आणि टीव्ही कलाकार चाहत पांडे निवडणुकीत पराभूत झाली. ‘आप’ने तेलंगणात उमेदवार उभे केले नाही. पण इतर तीन राज्यांत उमेदवार उभे केले होते. त्यात छत्तीसगडमध्ये 0.97%, मध्यप्रदेशात 0.42% आणि राजस्थानमध्ये 0.37% टक्के मते मिळाली.

हे सुद्धा वाचा

२०२२ मध्ये अशी होती कामगिरी

5 राज्यांमध्ये ‘आप’ला मिळालेली मतं

गोवा विधानसभा निवडणूक – 6.77 टक्के

पंजाब विधानसभा निवडणूक – 42. 01 टक्के

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक – 0.38 टक्के

उत्तराखंड विधानसभा निवडणूक – 3.32 टक्के

मणिपूर विधानसभा निवडणूक – 0 टक्के

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.