Assembly Election : आजपासून संसदेचं वादळी अधिवेशन, कोणत्या 10 मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधारी भिडण्याची शक्यता? वाचा

अग्निवीर योजना, वाढती महागाई आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण यासोबतच शेतकऱ्यांच्या समस्या, एमएसपी, बेरोजगारी, भारत-चीन सीमेवरील परिस्थिती, देशातील वाढता तणाव, नुपूर शर्मा, अशा अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्ष चर्चा करणार आहे.

Assembly Election : आजपासून संसदेचं वादळी अधिवेशन, कोणत्या 10 मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधारी भिडण्याची शक्यता? वाचा
आजपासून संसदेचं वादळी अधिवेशन, कोणत्या 10 मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधारी भिडण्याची शक्यता? वाचाImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 6:03 AM

नवी दिल्ली : आजपासून सुरू होणारे संसदेचे पावसाळी अधिवेशन (Assembly Election) हे वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक (President Election) होणार आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे सदस्य संसद भवन संकुलात नवीन राष्ट्रपतींसाठी मतदान करतील. लोकसभेच्या सचिवालयाने शुक्रवारी जारी केलेल्या बुलेटिननुसार संसदेच्या स्थायी समित्यांनी विचारात घेतलेल्या चार विधेयकांव्यतिरिक्त सरकार अधिवेशनादरम्यान 24 नवीन विधेयके सादर करणार आहे. अधिवेशनादरम्यान भारतीय अंटार्क्टिक विधेयक 2022 पुन्हा सादर केले जाईल, असे सांगण्यात आले आहे. यापूर्वी हे विधेयक 1 एप्रिल 2022 रोजी सादर करण्यात आले होते. तसेच या अधिवेशनात काही मुद्दे गााजण्याची शक्यात आहे. त्यात अग्निवीर योजना, वाढती महागाई (Inflation) आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण यासोबतच शेतकऱ्यांच्या समस्या, एमएसपी, बेरोजगारी, भारत-चीन सीमेवरील परिस्थिती, देशातील वाढता तणाव, नुपूर शर्मा, अशा अनेक मुद्द्यांवर विरोधी पक्ष चर्चा करणार आहे. 18 जुलैपासून सुरू होणारे संसदेचे पावसाळी अधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत चालण्याची शक्यता आहे.

  1. महागाई : देशात वाढलेली महागाई तसेच पेट्रोल डिझेलच्या किमतींचा झालेला भडका यावरून विरोधक भाजपला धारेवर धरण्याचं काम करणार असल्याचा अंदाज या अधिवेशनात वर्तवण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसात महागाई वरून केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवण्याचे काम विरोधी पक्षांकडून होत आहे, तेच या अधिवेशनात ही दिसण्याची शक्यता आहे.
  2. अग्निपथ योजना : तसेच सैन्य भरतीसाठी आणलेली अग्निपथ योजना आणि त्या अग्निपथ योजनेला झालेला कडाडून विरोध, देशभरात झालेली हिंसक आंदोलनं, त्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी योजना मागे घेण्याची केलेली मागणी, हे सर्व मुद्दे अधिवेशनात चांगलेच गाजताना पाहायला मिळणार आहेत.
  3. रुपयाची घसरण : तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया हा दिवसेंदिवस घसरत चालला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीही गगनाला भिडू लागलेल्या आहे. त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे, यावरही अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे.
  4. शेतकऱ्यांच्या समस्या : तसेच या अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्नही मार्गी लावण्याबाबत आग्रह धरला जाणार आहे. एमएसपी बाबत ही काही ठोस निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
  5. बेरोजगारी : या अधिवेशनात आणखी एक मुद्दा नक्की गाजणार म्हणजे तो म्हणजे देशातील बेरोजगारीचा, जगाला अडीच वर्ष कोरोनाने तडाखा दिल्यानंतर भारतातील बेरोजगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, यावर विरोधक आक्रमक होताना दिसून येतील.
  6. चीन सीमाप्रश्न : तसेच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला भारत-चीन सीमेचा प्रश्न संसदेत चर्चला येऊ शकतो, भारत-चीन सीमेवर सध्याही तणावाची स्थिती आहे.
  7. वाढणारा तणाव : विविध राजकीय परिस्थितीवरून देशात वाढणार तणाव यावरही अधिवेशनात चर्चा होऊ शकते. यावरून विरोधी पक्ष भाजपला आक्रमक उत्तर देताना दिसून येतील.
  8. तसेच गेल्या अनेक दिवसात नुपूर शर्मा प्रकरण देशभरात गाजत आहे. यावरून देशाला माफी मागायला लागली अशी टीका काँग्रेसकडून वारंवार होत आहे. तसेच मुस्लिम धर्मियांनी नपूर शर्मा विरोधात देशभरात आंदोलन केली आहेत. हेही प्रकरण संसदेच्या अधिवेशनात चर्चेत येऊ शकतं.
  9. असंसदीय शब्द : या अधिवेशनात काही असनसदीय शब्दांवर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र ते शब्द कोणते असावे, यावरून विरोधक सत्ताधारी यांच्यात वाद निर्माण होऊ शकतो.
  10. आंदोलनांना बंदी : तसेच आपल्या विविध मागण्यांसाठी खासदारांना संसद परिसरात आंदोलनं करता येणार नाहीत, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे आंदोलनाचा हक्क तुम्ही कसे नाकारू शकता? यावरूनही वाद होऊ शकतो.
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'.
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले.
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!.
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल.
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती.
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?.
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?.
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?.
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?.
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?.