प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी : आठवले

लातूर : सध्या राज्यात भोंगे आणि हनुमाण चालीसावरून राजकारण चांगलेच तापलेले आहे. राज ठारके (raj thackeray) यांच्या भोंग्याच्या भुमिकेवरून वंचित आघाडी आणि मनसे यांच्यामध्ये वाक युद्ध रंगले आहे. राज ठाकरे यांनी राज्यातील मुस्लिम समाजाच्या आजान देण्यावर आणि मशिदीवर (mosques) लावण्यात येणाऱ्या भोंग्यावर जोरदार टीका केली होती. तसेच राज ठाकरेंची यांनी राज्य सरकारने मशिदीवरील न उतरवल्यास हनुमान […]

प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी : आठवले
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 6:03 PM

लातूर : सध्या राज्यात भोंगे आणि हनुमाण चालीसावरून राजकारण चांगलेच तापलेले आहे. राज ठारके (raj thackeray) यांच्या भोंग्याच्या भुमिकेवरून वंचित आघाडी आणि मनसे यांच्यामध्ये वाक युद्ध रंगले आहे. राज ठाकरे यांनी राज्यातील मुस्लिम समाजाच्या आजान देण्यावर आणि मशिदीवर (mosques) लावण्यात येणाऱ्या भोंग्यावर जोरदार टीका केली होती. तसेच राज ठाकरेंची यांनी राज्य सरकारने मशिदीवरील न उतरवल्यास हनुमान चालिसा लावणार असल्याचे सांगितले होते. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हल्ला चढवताना होता. त्यानंतर राज यांच्या उत्तर सभेनंतर पुन्हा एकदा भोंगे आणि हनुमाण चालीसावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. त्यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी मशिदीवरील भोगे काढायला आरपीआयचा विरोध असल्याचे म्हटले आहे. याचवेळी आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी आणि आरपीआयचे अध्यक्ष पद घ्यावे असे म्हटले आहे. ते लातूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

वंचित आघाडी बरखास्त करावी

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले लातूर येथे आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार यांचे समर्थन करताना, शरद पवार हे जातीवादी नाहीत, असे म्हटले. तर अलीकडे राज ठाकरेंचा तोल सुटत असल्याचेही आठवले यांनी म्हटले आहे. बाबासाहेबांचा विचार हा सत्तेपर्यंत पोहोचण्याचा विचार आहे. सत्तेत जाऊन लोकांना न्याय देता येतो त्यामुळे सत्तेत गेले पाहिजे. आपण पोहोचत नसलो तर इतरांच्या मदतीने सत्तेपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यामुळे माझे समाजाला आवाहन आहे की एकच पक्ष रिपब्लिकन पक्ष व्हावा. नेत्यांचे ऐक्य होत नसेल तर जनतेचे ऐक्य व्हावे. लोकांची इच्छा आहे की सर्व नेते एक व्हावे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडी बरखास्त करावी, असे आवाहन केले. तसेच प्रकाश आंबेडकरांनी आरपीआयचे अध्यक्ष पद घ्यावे आणि डॉ. बाबासाहेबांचा पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष चालवावा, असे ही त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी प्रकाश आंबेडकरकर यांना टोला लगावता निवडून येण्यासाठी लागणारी मत (वंचितसारख्या) अशा प्रयोगातून मिळत नाही असं म्हटलं आहे. सत्तेय राहण्यासाठी कोणत्यातरी पक्षाशी युती करून लढले पाहिजे. तर महाराष्ट्रात 2-3 पक्ष एकत्र आल्याशिवाय सत्ता स्थापन होत नाही, असेही आठवले यांनी म्हटलं आहे.

युपीमध्ये आरपीआय पक्ष वाढवणार

याचबरोबर आठवले यांनी पाच राज्यांच्या पार पाडलेल्या निवडणूका आणि लागलेल्या निकालावर बोलताना, या निवडणुकीत युपीमध्ये मायावतीची एक जागा निवडून आली नाही असे म्हटले आहे. तसेच मायावतीचा 2014 मध्ये एकही खासदार निवडून आलेला नाही. त्यामुळे आपले पुढचे ध्येय हे युपी असून bsp ची जागा मी घेणार आणि युपीमध्ये जाऊन RPI वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही आठवले यांनी म्हटले आहे. युपीमध्ये बीएसपीची परिस्थिती कठीण असल्यामुळे लोकांनी आरपीआयमध्ये यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

साहित्य संमेलनाचे निमंत्रण नाही

पत्रकारांनी आठवले यांना साहित्य संमेलनाचे निमंत्रणावरून छेडले. त्यावर त्यांनी मी संसदेतला कवी म्हणून मला साहित्य संमेलनाचे निमंत्रण देत नसावेत, असे मिश्कील उत्तरे दिले. तसेच कदाचित याचमुळे उदगीर साहित्य संमेलनाचे निमंत्रण आयोजक देत नाहीत, असेही ते म्हणाले.

इतर बातम्या : 

Chandrakant Patil: राज ठाकरेंच्या आधीपासून आम्ही हिंदुत्वाचे मुद्दे मांडतोय; चंद्रकांत पाटलांच्या टोल्याचा नेमका अर्थ काय?

Cm Uddhav Thackeray मंत्रालयात येताच मुख्यमंत्र्यांचा कामाचा धडाका, कोस्टल रोडचाही घेतला आढावा

Jayant Patil : राज ठाकरेंची सभा ही उत्तर सभा नाही तर उतारा सभा! जयंत पाटलांचा जोरदार टोला

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.