माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत घरवापसी करणारे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Mar 02, 2020 | 10:40 AM

औरंगाबाद : नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत घरवापसी करणारे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे (Atrocity FIR against Harshavardhan Jadhav). त्यांच्यावर एका व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. यानंतर आता औरंगाबादमधील राजकीय वर्तुळात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

पीडित व्यक्तीची हर्षवर्धन जाधव यांच्या जमिनीच्या प्लॉट शेजारी टपरी होती. ती टपरी काढण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे. त्याने याविरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार देत जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला.

हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणातील सतत वादग्रस्त ठरलेलं व्यक्तिमत्त्व आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे असो किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, हर्षवर्धन जाधव यांनी कुणालाच सोडलं नाही. त्यांनी बेफामपणे अनेक नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या.

कोण आहेत हर्षवर्धन ?

  • हर्षवर्धन जाधव हे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.
  • हर्षवर्धन जाधव हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर कन्नड विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते.
  • मात्र पाच वर्षांच्या आत त्यांनी पक्षांतर्गत मतभेदामुळे मनसेला सोडचिठ्ठी दिली होती.
  • त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
  • 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला.
  • 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही हर्षवर्धन जाधव यांना विजय मिळवता आला नाही.
  • शिवसेनेच्या उदयसिंग राजपूत यांनी त्यांचा पराभव केला.

Atrocity FIR against Harshavardhan Jadhav

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.