ठाणे : महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi government) वर्षपुर्तीमुळे राजकीय वर्तुळात विरोधक आणि सत्ताधारी असा शाब्दिक सामना रंगल्याचं पाहायला मिळत आहे. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर (BJP MLA Atul Bhatkhalkar) यांनीही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. या सरकारनं कसंबसं एक वर्ष पूर्ण केलं. महाभकास असं हे एक वर्ष आहे. सर्व आघाडीवर हे अपयशी सरकार झालं आहे अशा शब्दात भातखळकरांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. मराठा आरक्षण, कोरोनाचं संकट असेल सगळ्यात सरकार अपयशी ठरल्याचं भातखळकर म्हणाले. (Atul Bhatkhalkar criticized on cm Uddhav Thackeray in press conference)
इतकंच नाही तर यावेळी भातखळकरांनी उद्धव ठाकरेंवरही घणाघाती टीका केली आहे. नावातच यु आणि टी असल्यामुळे हे यु टर्न घेत आहेत असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आता शिवसेना अजानची स्पर्धा भरवत आहे. हा एक यु टर्न आहे. विकास कामाला स्थगिती देणं किंवा खेळ खंडोबा करणं हे या महाभकास सरकारचं काम असल्याचं असल्याचं भातखळकरांनी म्हटलं.
‘राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक विक्रम केले’
या पत्रकार परिषदेमध्ये भातखळकरांनी मुख्यमं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे. मुख्यमंत्री आषाढी एकादशीला पंढरपूरला गेले पण तिथे तीर्थ न घेणारे आणि मूर्तीला हात न लावणारे हे मुख्यमंत्री आहेत. इतकंच नाही तर 8 महिने हे मंत्रालयातच गेले नाहीत असे हे पहिले मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा एक विशेष नागरी सत्कार करावा अशा शब्दात भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांनी चिमटे काढले आहेत.
यावेळी भातखळकरांनी कोरोना ते मराठा आरक्षण अशा मुद्दयावर सरकारवर घणाघाती टीका केली. महाराष्ट्र हा कोरोनाचा केपीटल आहे आणि मृत्यूही सर्वात जास्त आहे. कोरोनाच्या काळात या ठाणे महापालिकाने 600 रुपये सुद्धा प्रत्येक व्यक्ती मागे खर्च करण्यात औदार्य केलं नाही. आयजीच्या जीवावर बायजी उदार अशी सरकारची गत असून मदत ही शासनाची आणि वाटताना स्वतःच्या आणि पक्षाच्या नांवावर वाटली जात असल्याचं त्यांनी म्हटलं.
तर या सरकारची नियत साफ नाही. मराठा आरक्षण टिकावं ही या सरकारची इच्छाच नाही. ज्या बेंचने स्टे दिला आहे त्याच बेंचकडे जाऊ नये एवढं तर शाळकरी मुलालाही कळत पण यांना तेवढं ही समजलं नाही. आरक्षण देण्याची यांची नियतच नाही असा थेट आरपो यावेळी भातखळकरांनी केला. त्यांच्या या कठोर टीकेला आता शिवसेना उत्तर देणारं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. (Atul Bhatkhalkar criticized on cm Uddhav Thackeray in press conference)
इतर बातम्या –
मुख्यमंत्री घरी बसलेले असतील तर राज्य धोक्याच्या वळणावरच; अतुल भातखळकरांचा टोला
Atul Bhatkhalkar | पवारांची वृत्ती पाठीत खंजीर खुपसण्याची – अतुल भातखळकर – tv9 pic.twitter.com/lVmapXps5y
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 26, 2020
(Atul Bhatkhalkar criticized on cm Uddhav Thackeray in press conference)