निर्णयांमध्ये एकवाक्यता हवी, मात्र राज्यात रावणासारखे दहा तोंडाचे सरकार; निर्बंधांवरून भातखळकरांचा निशाणा

राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. हे सरकार दहा तोंडाचे असून, निर्बंधांबाबत एकवाक्यता नसल्याची टीका त्यांनी केली आहे.

निर्णयांमध्ये एकवाक्यता हवी, मात्र राज्यात रावणासारखे दहा तोंडाचे सरकार; निर्बंधांवरून भातखळकरांचा निशाणा
मोदींच्या हस्ते उद्घाटन करा-भातखळकर
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 4:34 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गुरुवारी एकट्या मुंबईमध्ये वीस हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढून आले आहेत. दरम्यान वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्य सरकारकडून काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले भातखळकर ? 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनामुळे पुन्हा एकदा सरकारकडून निर्बंध लावण्यात येत आहेत. मात्र निर्बंध नेमके काय असतील याबाबत महाविकास आघाडीमधील नेत्यांंमध्ये एकवाक्यता नसल्याची टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. रावणासारख दहा तोंडाने बोलणारे आणि चालणारे हे सरकार आहे. निर्बंधांच्या नावाखाली जनतेमध्ये दहशत निर्माण केली जात असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे. कोरोनामुळे जर मुंबईत लॉकडाऊनची घोषणा केली, तर जनतेचे अतोनात नुकसान होणार आहे. या नुकसानाची जबाबदारी कोण घेणार? लॉकडाऊनमध्ये नुकसान झाल्यास सरकारने मदत करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

…तर राज्यातील निर्बंध वाढणार – टोपे

दरम्यान राज्यात अनावश्यक गोष्टींमुळे कोरोना संसर्ग वाढत आहे. ज्या गोष्टींमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे, त्यावर बंदी आणली जाईल, तसेच वेळोवेळी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्याचे कम सुरू असून, आवश्यक असल्यास मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर निर्बंध अधिक कडक करण्यात येऊ शकतात. नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे. बाहेर पडताना मास्क घालावा. गर्दी टाळावी, घरी आल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. कोरोनाची लक्षणे आढल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी आक्षेपार्ह लिखाण, नवी मुंबईत भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक

KDCC Bank Election Result : कोल्हापूर जिल्हा बँकेवर सतेज पाटील हसन मुश्रीफ यांचं वर्चस्व, संजय मंडलिक यांच्या आघाडीला 3 जागा

दिल्लीत दिलजमाई, गल्लीत गोंधळ, सत्तार-दानवेंच्या भेटीने सोयगाव नगरपंचायतीत कार्यकर्ते का संभ्रमात?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.