आमदार निवासाच्या पुनर्बांधणीचा 300 कोटींचा गफला कोणाचा?; भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सवाल
मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. (atul bhatkhalkar raised questions on manora MLA building repairing tender)
मुंबई: मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. मनोराचे कंत्राट 600 कोटीवरून 900 कोटींवर कसे गेले? हा 300 कोटींचा अतिरिक्त गफला कुणाचा?, असा थेट सवाल भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. भातखळकर यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहून हा सवाल केला आहे. तसेच हे कंत्राट तात्काळ रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. (atul bhatkhalkar raised questions on manora MLA building repairing tender)
मुख्य दक्षता आयुक्तांकडे तक्रार करणार
अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीसाठी काढण्यात आलेल्या टेंडरवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत. आमदार निवासाचे 600 कोटींचे कंत्राट रद्द करून ते तब्बल 900 कोटींवर नेण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून केले जात असून केवळ 2 वर्षाच्या कालावधीत हा खर्च तब्बल 66 टक्क्यांनी कसा वाढला? हा 300 कोटींचा गफला कोणाचा? असे प्रश्न करत, मुख्यमंत्र्यांनी हे कंत्राट तात्काळ रद्द करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अन्यथा या संपूर्ण प्रकरणाची मुख्य दक्षता आयुक्तांकडे तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा भातखळकर यांनी दिला आहे.
काम 600 कोटींचं, फिनिशिंग 300 कोटींची
तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीच्या कामाकरिता केंद्र सरकारची संस्था असलेल्या नॅशनल बिल्डींग कन्स्ट्रक्शन कार्पोरेशन सोबत 600 कोटींचा करार केला होता. परंतु महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर तो करार रद्द केला. नवीन कंत्राटात केवळ विद्युतीकरणाच्या कामाकरिता तब्बल 250 कोटींचा खर्च दाखविण्यात आला आहे. तसेच या कामाच्या वास्तुविशारदांनी वाढीव 300 कोटी रुपयांचा खर्च हा इमारतीच्या फिनिशिंगवर होणार असल्याचे सांगितले आहे. 600 कोटीं रुपयांच्या कामावर 300 कोटी रुपयांची फिनिशिंग केली जाणार असल्याचे सांगणे म्हणजे यात नक्कीच मोठा घोटाळा असल्याची शक्यता आहे, असा दावा भातखळकर यांनी केला आहे.
तर उग्र आंदोलन करू
सेंट्रल विस्टा इमारतीच्या बांधकामावरून टीका करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या सरकारचा ‘कंत्राट’नामा व वायफळ खर्च दिसत नाही काय? महाराष्ट्रात कोरोनावर खर्च करण्यासाठी पैसे नसताना एवढ्या वाढीव दराने काढण्यात आलेले कंत्राट मुख्यमंत्र्यांनी तात्काळ रद्द करावे अन्यथा या विरोधात भारतीय जनता पार्टी मोठे आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला. (atul bhatkhalkar raised questions on manora MLA building repairing tender)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 7 May 2021 https://t.co/yBiOabRh7e #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 7, 2021
संबंधित बातम्या:
मराठा आरक्षणासाठी प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांना भेटू: अजित पवार
PM निवासस्थान, संसंद भवनाचं काम पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करा; रोहित पवारांचा भातखळकरांना टोला
कोरोनाशी लढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घ्या; मोदी एकटे कोरोनाशी लढू शकत नाहीत: नवाब मलिक
(atul bhatkhalkar raised questions on manora MLA building repairing tender)