Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरे उपनगरात दाखवा, 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण फुकट मिळवा; भातखळकरांचं ट्विट

तौक्ते वादळामुळे झालेल्या पावसाने मुंबईलाही अक्षरश: झोडपून काढलं. (atul bhatkhalkar slams aaditya thackeray over cyclone tauktae hits mumbai)

आदित्य ठाकरे उपनगरात दाखवा, 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण फुकट मिळवा; भातखळकरांचं ट्विट
atul bhatkhalkar
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 3:07 PM

मुंबई: तौक्ते वादळामुळे झालेल्या पावसाने मुंबईलाही अक्षरश: झोडपून काढलं. त्यामुळे समुद्र किनारी राहणाऱ्या मच्छिमारांचं मोठं नुकसान झालं असून त्यांची अजूनही दखल घेण्यात आली नाही. त्यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे उपनगरात दाखवा आणि 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करून घ्या, अशी ऑफरच अतुल भातखळकर यांनी दिली आहे. (atul bhatkhalkar slams aaditya thackeray over cyclone tauktae hits mumbai)

अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून एका व्हिडीओद्वारे ही ऑफर दिली आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कसे अपयशी ठरले आहेत, याकडेही लक्ष वेधले. मे महिन्यात आलेले निसर्ग चक्रीवादळ आणि परवा आलेले तौक्ते चक्रीवादळ यामुळे वर्सोवा, मढ, मार्वे, बोरिवली या परिसरातील मच्छिमारांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. मालाडमध्ये झाडाची फांदी पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. चाळी, झोपडपट्ट्या, इमारतींमध्ये पाणी शिरून लोकांच्या घरगुती साहित्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. झाडे पडल्यामुळे 48 तासांपेक्षा अधिक काळ अनेक ठिकाणी रस्ते बंद होते. मी स्वतः व भाजपने वारंवार मागणी करुनही कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत उपनगरांतील लोकांना करण्यात आली नाही, असा आरोप भातखळकर यांनी केला आहे.

आदित्य यांनी वर्षभरात काय केले?

मुंबईत वादळ आल्यानंतर पालकमंत्री आदित्य ठाकरे हे लोकांना वाऱ्यावर सोडून घरात बसून एसीची हवा खाण्यात मग्न होते. लपूनछपून ताडोबा पर्यटन करणाऱ्या आदित्य यांनी अपुऱ्या वैद्यकीय सुविधेअभावी तडफडून, होरपळून मृत्युमुखी पडणाऱ्या मुंबईतील रुग्णांकडे ढुंकूनही पाहिले नाही. आदित्य यांनी मागील वर्षभराच्या काळात एकाही कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयाला भेटी दिल्या नाहीत. त्यामुळे आदित्य यांनी मागील वर्षभराच्या काळात मुंबई उपनगराच्या नागरिकांसाठी काय काम केले? याचे जनतेला उत्तर द्यावे, असा सवालही त्यांनी केला आहे.

जिल्हा नियोजन समितीची बैठक एकदाच

आदित्य यांची मुंबई उपनगराचे पालकमंत्री नेमणूक होऊन आज दीड वर्षे उलटून गेली आहेत. या काळात केवळ एकदाच जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांवर कोणतीही कार्यवाही पालकमंत्र्यांकडून करण्यात आलेली नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे. (atul bhatkhalkar slams aaditya thackeray over cyclone tauktae hits mumbai)

संबंधित बातम्या:

LIVE | नागपूर जिल्हा नियोजन विभागाच्या निधीच्या वाटपात भेदभाव, नितीन राऊतांविरोधात न्यायालयात जाण्याचा भाजपा आमदाराचा इशारा

पंतप्रधान मोदींना वाटतं मराठा आरक्षण राज्याचा विषय, त्यामुळे संभाजीराजेंना भेटले नाहीत: चंद्रकांत पाटील

आरक्षणाचे जनक शाहूंचा आशीर्वाद घेऊन संभाजीराजे मोहिमेवर, मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा सुरु

(atul bhatkhalkar slams aaditya thackeray over cyclone tauktae hits mumbai)

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.