Aurangabad | औरंगाबाद ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या गडावर शिंदे गटाचा झेंडा, 16 पैकी 12 जागांवर विजय, काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपाला भोपळा

औरंगाबादेत आर्थिक आणि औद्योगिक दृष्ट्या सर्वात महत्त्वाच्या वडगाव कोल्हाटी बजाजनगर ग्रामपंचायतीवर एकनाथ शिंदे गटाचा विजय झाला आहे.

Aurangabad | औरंगाबाद ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या गडावर शिंदे गटाचा झेंडा, 16 पैकी 12 जागांवर विजय, काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपाला भोपळा
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 2:53 PM

औरंगाबादः शिवसेनेत उभी फूट पडल्याने औरंगाबाद ग्राम पंचायत निवडणुकीत (Aurangabad Gram Panchayat Election) उद्धव ठाकरेंच्या गटाला जोरदार फटका बसलाय. जिल्ह्यातील एकूण 16 ग्रामपंचायतींपैकी 12 जागांवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या पॅनलचा विजय झालाय. एकूण जिल्हाभराचा विचार करता भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती भोपळा लागल्याचं चित्र आहे. शिवसेनेतून (Shivsena Rebel) एकनाथ शिंदे गटाने फारकत घेतल्यानंतर जिल्ह्यातील ही पहिलीच निवडणूक होती. बंडखोर आमदारांवर जनता नाराज असल्याचंही बोललं जात होतं. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक रहिवाशांनी एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने कौल दिल्याचं स्पष्ट झालंय. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वात मोठी वडगाव-कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीवर बंडखोर आमदार संजय शिरसाट यांचं पॅनल विजयी झालंय. ही ग्रामपंचायतदेखील शिंदे गटाकडे आली आहे. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचे निकाल महत्त्वाचे मानले जात आहेत.

16 पैकी 12 ग्रामपंचायती शिंदे गटाकडे

औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायत निवडणुकीत एकनाथ शिंदे गट हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींपैकी 12 ठिकाणी एकाथ शिंदे पुरस्कृत पॅनल मोठ्या फरकाने विजयी ठरले आहे. औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाची मानली जाणारी वडगाव-कोल्हाटी बजाजनगर ही ग्रामपंचायतही आमदर शिरसाट यांच्या ताब्यात आली आहे. जिल्ह्यातील फक्त 2 ग्रामपंचायतींवर मूळ शिवसेनेच्या पॅनलचा विजय झाला आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या हाती एकही ग्रामपंचायत लागेलेली नाही.

जिल्हा- औरंगाबाद

  • एकूण ग्रामपंचायत- 16
  • शिवसेना – 2
  • शिंदे गट- 12
  • भाजप- 0
  • राष्ट्रवादी- 0
  • राष्ट्रवादी- 0
  • काँग्रेस-0
  • इतर- 2

सिल्लोडमध्ये सत्तारांकडे 2 ग्रामपंचायती

सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघातही शिंदे गटाने विजयी झेंडा फडकवला आहे. येथील तीन पैकी 2 ग्रामपंचायतवर शिंदे गट विजयी झाला आहे. नानेगाव आणि जंजाळ या दोन ग्रामपंचायत अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात आल्या आहेत.

पैठणमध्ये संदिपान भुमरेंचा विजय

पैठण तालुक्यातील सात पैकी 6 ग्रामपंचायतींवर एकनाथ शिंदे गटाचा विजय झाला आहे. शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांनी येथील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जोरदार प्रचार केला होता. तालुक्यातील आपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अगरनांदर, गावतांडा या ग्रामपंचायतींवर भुमरे पुरस्कृत पॅनलचा विजय झाला आहे.

प्रतिष्ठेच्या वडगाव कोल्हाटीत काय स्थिती?

औरंगाबादेत आर्थिक आणि औद्योगिक दृष्ट्या सर्वात महत्त्वाच्या वडगाव कोल्हाटी बजाजनगर ग्रामपंचायतीवर एकनाथ शिंदे गटाचा विजय झाला आहे. गेल्या दीड दशकापासून शिवसेना आमदार संजय शिरसाट यांच्या ताब्यात ही ग्रामपंचायत होती. शिरसाट यांनी बंड केल्यानंतर ग्रामीण भागातील जनता कुणाला कौल देते, याकडे सर्वांचं लक्ष होतं. मूळ शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांनीदेखील येथे प्रचारासाठी जोर लावला होता. मात्र शिरसाट यांच्या पॅनलचाच येथे विजय झाला.  येथील 1 6 पैकी 11 जागा जिंकत शिंदे गटानं बहुमत मिळवलं.  चार जागा शिवसेनेकडे तर 2 जागांवर भाजपचा विजय झाला.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.