कार्यकर्त्यांनो, चुकीचं वागलात तर मी वाचवायला येणार नाही : इम्तियाज जलील
औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएमने शिवसेनेचा पराभव करत मोठा धक्का दिला. वंचित बहुजन आघाडीकडून लढणारे एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. मात्र या निकालानंतर शिवसेना नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक वातावरण खराब करण्याचं काम करत असल्याचा आरोप नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केला. निवडणूक निकाल लागला त्यादिवशी काही […]

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएमने शिवसेनेचा पराभव करत मोठा धक्का दिला. वंचित बहुजन आघाडीकडून लढणारे एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. मात्र या निकालानंतर शिवसेना नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक वातावरण खराब करण्याचं काम करत असल्याचा आरोप नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केला.
निवडणूक निकाल लागला त्यादिवशी काही युवकांनी हुल्लडबाजी केली. माझ्या कार्यकर्त्यांमुळे कोणाला त्रास झाला असेल तर मी माफी मागतो, असं इम्तियाज जलील म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मर्यादेत राहावं. तुम्ही चुकीचं वागलात तर मी वाचवायला येणार नाही, असा इशारा इम्तियाज जलील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आता राजकारण बंद करून शहराच्या विकासासाठी सोबत यावं असं आवाहनही यावेळी इम्तियाज जलील यांनी केलं. माझे कार्यकर्ते चुकीचे काम करत असतील तर मला सांगा, मी दोनशे टक्के कारवाई करेन, असं आश्वासनही जलील यांनी दिलं.
औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील यांचा विजय
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. या मतदारसंघात शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे, एमआयएमचे इम्तियाज जलील, काँग्रेसकडून सुभाष झांबड आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव अशी चौरंगी लढत झाली. मात्र खैरे आणि जलील यांच्यात खरी फाईट होऊन जलील यांनी विजय मिळवला.
संबंधित बातम्या
आमच्या महिला-मुलींवर हिरवा गुलाल उधळला, इम्तियाज जलीलला सरळ करणार : खैरे