अविनाश जाधवांचा दे धक्का, राम कदमांच्या समर्थकांचा मनसेत प्रवेश

ठाणे आणि वसई विरार मधील शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. (Avinash Jadhav Ram Kadam)

अविनाश जाधवांचा दे धक्का, राम कदमांच्या समर्थकांचा मनसेत प्रवेश
चांदिवलीतील भाजप कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 12:23 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी भाजप आमदार राम कदम यांना जोरदार झटका दिला आहे. भाजप नेते सुनील यादव आणि राम कदम यांच्या समर्थकांनी मनसेत प्रवेश केला. मुंबईतील चांदिवली विधानसभेतील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला. (Avinash Jadhav give volt to Ram Kadam BJP volunteers join MNS)

ठाणे आणि वसई विरार मधील शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला. यामध्ये सुनील यादव, राम कदम यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांचा भरणा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला.

नांदेडमध्ये शिवसेना-काँग्रेस कार्यकर्त्यांचा मनसेप्रवेश

जुन्या नांदेडमधल्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असलेल्या युवकांनी दोन दिवसांपूर्वी मनसेत प्रवेश केला. त्यामुळे मनसेची ताकद आणखी वाढणार आहे. मनसेचे नांदेड शहर अध्यक्ष बालाजी एकलारे आणि जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागीरदार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मनसे नांदेडमध्ये पक्ष बांधणी करत असल्याचे चित्र आहे.

ठाण्यातही मनसेत येणाऱ्यांची संख्या वाढली

शहापूर तालुक्यातही ऑक्टोबर महिन्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचे पाहायला मिळाले. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश झाला.

तत्पूर्वी कल्याण-डोंबिवली भागातील शिवसेना आणि भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला. माजी आमदार प्रकाश भोईर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख वैभव किणी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे शिवसेना भाजपला ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भगदाड पडल्याची चर्चा रंगली. (Avinash Jadhav give volt to Ram Kadam BJP volunteers join MNS)

औरंगाबादेतील निष्ठावान शिवसैनिक मनसेत गेल्या वर्षी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला होता. तर फेब्रुवारी महिन्यात चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू शिवसैनिक सुहास दशरथे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर खैरे यांच्या सात निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षप्रवेश केला होता.

संबंधित बातम्या:

पुण्यातील युवासेनेचा उपनेता मनसेमध्ये, राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील नागरिकांचा मनसेप्रवेश

(Avinash Jadhav give volt to Ram Kadam BJP volunteers join MNS)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.