Ayodhya Ram Mandir | बाळासाहेबांची आठवण ठेऊन मनसेची पंतप्रधान मोदींकडे पत्र लिहून मोठी मागणी

Ayodhya Ram Mandir | राम मंदिर आंदोलनात दिवंगत हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचही मोठ योगदान आहे. मनसेने हीच गोष्ट लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलय. त्यांच्याकडे एक मोठी मागणी केली आहे.

Ayodhya Ram Mandir | बाळासाहेबांची आठवण ठेऊन मनसेची पंतप्रधान मोदींकडे पत्र लिहून मोठी मागणी
Ram mandir
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 11:40 AM

Ayodhya Ram Mandir | सध्या देशात सर्वत्र राम मंदिराची चर्चा सुरु आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिराच उद्घाटन होणार आहे. राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याची अयोध्येत जय्यत तयारी सुरु आहे. सध्या राम मंदिर निर्माणाच काम अंतिम टप्प्यात आहे. अयोध्येतील विमानतळ, रेल्वे स्टेशनच उद्घाटन 30 डिसेंबरला झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. संपूर्ण देशासाठी हा एक मोठा क्षण असेल. अयोध्येतील राम मंदिरासाठी बरीच वर्ष कारसेवकांनी लढा दिला. आंदोलन झाली. सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई जिंकल्यानंतर राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला. राम मंदिर उद्घाटनाचा एक भव्य सोहळा रंगणार आहे. सगळ्या देशाच याकडे लक्ष लागलं आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरुनही सध्या राजकारण सुरु आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहे. राजकीय पक्ष मतांची गणित जुळवत आहेत.

या सगळ्यामध्ये राम मंदिर आंदोलनात दिवंगत हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचही मोठ योगदान आहे. 90 च्या दशकात राम मंदिर आंदोलनाचा मुद्दा तापला होता. त्यावेळी बाळासाहेबांनीच ‘गर्व से कहो हम हिंदू है’ ही घोषणा राजकीय मंचावरुन दिली होती. बाळासाहेबांनी सर्व आंदोलक कार सेवकांचा समर्थन केलं होतं. राम मंदिर अयोध्येतच होणार, हा मुद्दा प्रखरपणे मांडला होता. आता त्याच बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये आहेत. भाजपाची साथ सोडून त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला हात दिलाय.

मनसेने काय मागणी केलीय?

नुकतच उद्धव ठाकरे यांना अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच निमंत्रण नसल्याच्या मुद्यावरुन आरोप-प्रत्यारोप झाले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे यांच्या पक्षाने एक मोठी मागणी केलीय. मनसेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलय. मनसेचे उपाधक्ष सतीश नारकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलय. त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव अयोध्येतील प्रमुख चौकाला देण्याची मागणी केली आहे. 22 जानेवारीला श्रीरामांची अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना आहे. 23 जानेवरीला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे, त्यांचे नाव देऊन त्यांचा उचित सन्मान करण्याची मागणी केली आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.