बिनधास्त बबनराव लोणीकर, वाद आणि बरंच काही; वाचा, सविस्तर

वादग्रस्त पण बिनधास्त आणि आघळपघळ राजकारणी म्हणून भाजपचे नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर परिचित आहेत. (Babanrao lonikar: BJP's most Controversial leader in maharashtra)

बिनधास्त बबनराव लोणीकर, वाद आणि बरंच काही; वाचा, सविस्तर
babanrao lonikar
Follow us
| Updated on: Apr 07, 2021 | 9:37 PM

मुंबई: वादग्रस्त पण बिनधास्त आणि आघळपघळ स्वभावाचे राजकारणी म्हणून भाजपचे नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर परिचित आहेत. वाद आणि लोणीकर असं जणू समीकरणच झालेलं आहे. परंतु, तितकेच अभ्यासू आणि चांगलं संघटन कौशल्य असलेला नेता म्हणूनही ते परिचित आहेत. (Babanrao lonikar: BJP’s most Controversial leader in maharashtra)

कसे आहेत लोणीकर

बबनराव दत्तात्रय यादव-लोणीकर हे त्यांचं संपूर्ण नाव. ते 57 वर्षाचे आहेत. जालना जिल्ह्यातील परतूर हा त्यांचा मतदारसंघ. परतूर तालुक्यातील लोणीमध्ये त्यांचं शिक्षण झालं आहे.

पंचायत समिती ते कॅबिनेट मंत्री

लोणीकरांच्या राजकारणाची सुरुवात पंचायत समितीपासून झाली. पंचायत समितीचे सदस्य आणि सभापती म्हणून त्यांनी काम पाहिलं. त्यानंतर ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले. नंतर 1999 ते 2004 या कालावधीत ते विधानसभेचे सदस्य होते. 2014मध्ये ते पुन्हा विधानसभेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांची फडणवीस सरकारमध्ये पाणीपुरवठा मंत्री म्हणून वर्णी लागली.

पाच निवडणुका लढवल्या

लोणीकरांनी आतापर्यंत पाच विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत. त्यापैकी तीन वेळा ते विजयी झाले आहेत. तर दोन वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

दोन बायका, वाद वाढला

लोणीकर हे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पाणीपुरवठा मंत्री होते. त्यांच्या डिग्रीचा वाद मिटत नाही तोच दुसऱ्या वादाला त्यांना सामोरे जावं लागलं होतं. लोणीकरांना दोन बायका असताना त्यांनी निवडणूक आयोगाकडे एकाच बायकोची माहिती का दिली? असा सवाल काँग्रेसकडून करण्यात आला होता. लोणीकरांच्या मतदारसंघातील मतदार यादीत मंदाकिनी आणि वंदना या दोन्ही बायकांची नावे आहेत. या दोघीही लोणीकरांच्या पत्नी असल्याचं नमूद करम्यात आलं आहे. मात्र, लोणीकरांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात केवळ त्यांची पत्नी मंदाकिनी यांचंच नाव असल्याचं काँग्रेसने म्हटलं होतं. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी हा आरोप केला होता. त्यामुळे लोणीकर चांगलेच अडचणीत आले होते.

तहसीलदार मॅडम हिरोईनसारख्या दिसतात

लोणीकर आणखी एका वक्तव्याने वादात सापडले होते. परतूर तालुक्यात कऱ्हाळाच्या 33 केव्ही उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. अधिवेशनाआधी शेतकऱ्यांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोर्चा होऊ शकतो. या मोर्चाला 50 हजार लोक यावेत. तुम्ही सांगा कुणाला आणायचं? देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील की सुधीर मुनगंटीवार यांना आणायचं? तुम्हाला कोण वाटतंय ते सांगा, नाहीतर एखादी हिरोईन आणायची असंल तर हिरोईन पण आणू. जर कुणी हिरोईन नाहीच भेटली, तर तहसिलदार मॅडम आहेच, असं लोणीकर म्हणाले होते. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली होती.

बनावट पदवीने घेरलं

लोणीकरांच्या पदवीवरूनही वाद झाला होता. त्यांची पदवी बनावट असल्याचं विरोधकांचं म्हणणं होतं. त्यावर त्यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं. परतुर येथील लालबहाद्दूर शात्री महाविद्यालयाच्या केंद्रावरून आपण बी. ए. प्रथम वर्षांची मुक्त विद्यापीठाची परीक्षा दिली. त्याची कागदपत्रे आपल्याकडे आहेत. औरंगाबादच्या सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या केंद्रावरून दुसऱ्या वर्षीची परीक्षा दिली. परंतु तेथे आपण उत्तीर्ण होऊ शकलो नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. (Babanrao lonikar: BJP’s most Controversial leader in maharashtra)

विधानसभेत उलटा टांगेन

लोणीकर पुन्हा एकदा चर्चेत आले ते त्यांच्या धमकीप्रकरणावरून. त्यांनी परतूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.पी. ठाकरे व आयपीएस अधिकारी हसन गौहर यांना फोनवरून धमकावले होते. ‘आमचे शंभर आमदार आहे, उद्या विधानसभेत उलटा टांगेन’, अशा शब्दात त्यांनी या पोलीस अधिकाऱ्यांना धमकावले होते. त्याची ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. या पोलीस अधिकाऱ्यांनी अवैध दारूचे अड्डे, मटका आणि गुटखा साठवणूक करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू केली होती. त्यांनी ओमप्रकाश मोर नावाच्या व्यापाऱ्यांच्या घरी छापा टाकला होता. मोर हे प्रामाणिक व्यक्ति असतानाही त्यांच्या घरावर छापा टाकल्याने लोणीकर भडकले होते. मोर प्रामाणिक माणूस आहे. ते साधा गुटखा सुद्धा खात नाही. एवढ्या मोठ्या श्रीमंत माणसाच्या घरावर धाड टाकताय, सापडलं का काही? असा सवाल करतानाच साहेब, आयपीएस अधिकारी आहे, त्याला काही बुद्धी आहे की नाही? तुम्ही काय रझाकारी लावली आहे का? विधानसभेत उलटा टांगेन तुम्हा सगळ्यांना, आयपीएस अधिकारी झाला म्हणून लय मोठा झाला आहे का?, असा सवाल त्यांनी केला होता. त्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी झालेल्या चुकीबद्दल माफीही मागितली होती. (Babanrao lonikar: BJP’s most Controversial leader in maharashtra)

संबंधित बातम्या:

कारखान्यातील स्लिप बॉय ते ठाकरे सरकारमध्ये मंत्री; वाचा, संदीपान भुमरेंचा थक्क करणारा प्रवास!

छात्रसंघाचे सरचिटणीस ते माजी अर्थमंत्री; ‘सुधीर मुनगंटीवार’ विदर्भातील लढवय्या नेता

गोल्ड मेडलिस्ट आणि राजकीय घराणं; वाचा, कोण आहेत नमिता मुंदडा?

(Babanrao lonikar: BJP’s most Controversial leader in maharashtra)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.