Bachchu Kadu : सर्वच अपक्ष दोषी आहे असे नाही, बच्चू कडू काँग्रेस आणि राष्टवादीवर बरसले, आरोप नेमका काय?

आपली चूक आहे म्हणून ते यशस्वी झाले.आपल्यातले काही बंडखोर निघाले म्हणून या निवडणुकीत यशस्वी ते झाले. शरद पवार जेव्हा कौतुक करतात तेव्हा त्यांचा निशाणा कुठे असतो हे सांगता येत नाही. मतदान कुठे केलं हे स्पष्ट दिसते.

Bachchu Kadu : सर्वच अपक्ष दोषी आहे असे नाही, बच्चू कडू काँग्रेस आणि राष्टवादीवर बरसले, आरोप नेमका काय?
बच्चू कडू काँग्रेस आणि राष्टवादीवर बरसलेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 12:59 PM

मुंबई – सर्वच अपक्ष दोषी आहे असे नाही आहे. यामध्ये आघाडीच्या तीनही मोठ्या पक्षांचे नियोजन चुकलं असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यांच्या नियोजनाचा समन्वय साधला नाही.समन्वय साधला असता तर संजय पवार (Sanjay Pawar) निवडुन आले असते. तीन पक्षात समन्वय नव्हता आणि खापर अपक्षावर फोडणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली. तसेच काँग्रेसने 44 ऐवजी 42 मते घेतली असते तर त्यातील दोन मत भेटले असते. हा विरोधकांचा कौतूक करण्याजोगा विषय नाही. चुक आपली आहे. कौतुक त्यांचं करण्यात अर्थ नाही. राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचा नाव न घेता शरद पवारांना (Sharad Pawar) टोला लगावला आहे.

निशाणा कुठे असतो हे सांगता येत नाही

आपली चूक आहे म्हणून ते यशस्वी झाले.आपल्यातले काही बंडखोर निघाले म्हणून या निवडणुकीत यशस्वी ते झाले. शरद पवार जेव्हा कौतुक करतात तेव्हा त्यांचा निशाणा कुठे असतो हे सांगता येत नाही. मतदान कुठे केलं हे स्पष्ट दिसते. जरी हे मतदान गोपनीय असलं तरी मतदान करताना प्रत्येकाला माहिती दिलेली असते असंही बच्चू कडू म्हणाले. शरद पवारांनी फडणवीसांचं कौतुक केल्याने अनेकांना आच्छर्य वाटले आहे. फडणवीसांना आमदारांना जवळ करण्याची सवय आहे. त्यामुळे त्यांचा विजय झाला असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे.

पंकजा मुंडे यांचे नेतृत्व मजबूत आहे

पंकजा मुंडे यांना वेगळे ठेवण्यात वेगवेगळी कारणे असू शकतात. पंकजा मुंडे यांचे नेतृत्व मजबूत आहे.त्यांना सतत डावलण्याचा प्रयत्न झाल्यास भाजपला फटका बसू शकतो. पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्यापासून सत्ताधाऱ्यांनी भाजपवरती सडकून टीका केली आहे. तसेच पंकजा मुंडे यांचे समर्थक देखील नाराज असल्याचे पाहायला मिळाले आहेत. संजय राऊत यांनी या प्रकरणावरून भाजपवरती जोरदार टीका केली. मुंडे आणि आमचे घरचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांची विचारपूस करणे हे आमचे कर्तव्य आहे. काहीवेळापूर्वी बीडमधील पंकजा मुंडेच्या कार्यकर्त्यांनी आज प्रवीण दरेकरांचा ताफा अडवला.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर ताफा पुढे सरकल्याची माहिती मिळाली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.