AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यमंत्री बच्चू कडूंच्या अडचणी वाढणार? बच्चूभाऊ विरोधात खटला चालवण्याचे राज्यपालांचे आदेश!

बनावट दस्ताऐवज बनवून शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने बच्चू कडू यांच्याविरोधात राज्यपालांकडे तक्रार केली होती. त्यानंतर राज्यपालांनी अकोला पोलीस अधीक्षकांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता बच्चू कडू यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यमंत्री बच्चू कडूंच्या अडचणी वाढणार? बच्चूभाऊ विरोधात खटला चालवण्याचे राज्यपालांचे आदेश!
बच्चू कडू यांच्याविरोधात खटला दाखल करण्याचे राज्यपालांचे आदेशImage Credit source: Twitter
Updated on: Feb 26, 2022 | 5:33 PM
Share

अकोला : शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. कारण बच्चू कडू यांच्याविरोधात खटला चालवण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी दिले आहेत. बनावट दस्ताऐवज बनवून शासकीय निधीचा (Government funds) अपहार केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने बच्चू कडू यांच्याविरोधात राज्यपालांकडे तक्रार केली होती. त्यानंतर राज्यपालांनी अकोला पोलीस अधीक्षकांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता बच्चू कडू यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय?

शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर रस्ते निधीबाबत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. बच्चू कडू यानी बनावट दस्ताऐवज बनवून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर शासकीय निधी वळता करुन घेत अपहार केला, असा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आलाय. याबाबतची सविस्तर माहिती राज्यपाल कोश्यारी यांना देण्यात आलीय. संबंधित कागदपत्रे तपासल्यानंतर आता राज्यपालांनी बच्चू कडू यांच्याविरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांचंही नाव समोर आलं आहे. काही इतर जिल्हा मार्ग आणि ग्राम मार्ग हे शासन क्रमांक नसलेल्या रस्त्यांच्या कामाची यादी जिल्हा परिषदेला पाठवून बच्चू कडू यांनी सरकारी निधीचा अपहार केल्याचं समोर आलं. याबाबतचे पुरावे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी समोर आणले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत राज्यपालांची भेट घेत योग्य कारवाईची मागणी केली होती.

Vanchit Bahujan Aghadi PC

वंचित बहुजन आघाडी पत्रकार परिषद, अकोला

बच्चू कडूंना दोन महिन्याचा सश्रम कारावास!

राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने 11 फेब्रुवारी रोजी हा निर्णय दिला. 2014च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रं सादर करताना बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवली होती. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी कोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणाचा आज निकाल आला असून बच्चू कडू यांना शिक्षा सुनावण्यात आली.

चुकीच्या निर्णयाचे स्वागत

दरम्यान, विधानसभा निवडणूक लढवताना 2014 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना मुंबईच्या या घरावर आम्ही कर्ज घेतले होते. त्या घराचा उल्लेख करण्याऐवजी कर्ज घेतलेल्या रकमेचा उल्लेख केला होता. हा काही गंभीर प्रकार नव्हता. मात्र या प्रकरणात न्यायालयाने आज जो काही चुकीचा निर्णय दिला आहे. त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

इतर बातम्या :

अनिल बोडेंच्या अडचणी वाढल्या, नाना पटोलेंबद्दलचे ते वक्तव्य भोवणार?

कायदेशीर सल्ला घेऊनच मराठा आयोगाच्या स्थापनेचा निर्णय, अशोक चव्हाण यांचं संभाजी छत्रपतींच्या वक्तव्यावर उत्तर

माझे हात-पाय तोडताना कराडला LIVE पाहायच होतं, पवारांच्या नेत्याचा दावा
माझे हात-पाय तोडताना कराडला LIVE पाहायच होतं, पवारांच्या नेत्याचा दावा.
आरोपांचा डान्सबार अन् महायुतीतच रंगले वार-प्रतिवार?
आरोपांचा डान्सबार अन् महायुतीतच रंगले वार-प्रतिवार?.
5 मंत्र्यांना बडतर्फ करा, ठाकरेंच्या नेत्यांची राज्यपालांकडे लिस्ट अन्
5 मंत्र्यांना बडतर्फ करा, ठाकरेंच्या नेत्यांची राज्यपालांकडे लिस्ट अन्.
अहवाल बदलला जाणार नाही ना? एकनाथ खडसेंचा तपास यंत्रणेवर सवाल
अहवाल बदलला जाणार नाही ना? एकनाथ खडसेंचा तपास यंत्रणेवर सवाल.
45 खासदार गप्प बसले, पण..; राज ठाकरेंचं वर्षा गायकवाड यांना पत्र
45 खासदार गप्प बसले, पण..; राज ठाकरेंचं वर्षा गायकवाड यांना पत्र.
पहलगाम हल्ल्यातल्या 2 अतिरेक्यांना कंठस्नान
पहलगाम हल्ल्यातल्या 2 अतिरेक्यांना कंठस्नान.
ये पब्लिक है...सब जानती है...पलटी मारली म्हणत फडणवीसांचा ठाकरेंना टोला
ये पब्लिक है...सब जानती है...पलटी मारली म्हणत फडणवीसांचा ठाकरेंना टोला.
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचे 20 मिनिटं; भावांमध्ये काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचे 20 मिनिटं; भावांमध्ये काय झाली चर्चा?.
सरकार धोकेबाज आणि विश्वासघातकी; रोहित पवारांचे नवे आरोप
सरकार धोकेबाज आणि विश्वासघातकी; रोहित पवारांचे नवे आरोप.
बोट दुर्घटना प्रकरण; 3 बेपत्ता मच्छीमारांचे मृतदेह सापडले
बोट दुर्घटना प्रकरण; 3 बेपत्ता मच्छीमारांचे मृतदेह सापडले.