तावडेंनी 25 फोन केले, मला माफ कर, जाऊ द्या….हितेंद्र ठाकूरांचा दावा, पैसे वाटपाचं प्रकरण

"विनोद तावडे हे राष्ट्रीय नेते आहेत. राष्ट्रीय सरचिटणीस लाज-शरम कोळून प्याले आहेत. 48 तास आधी मतदारसंघ सोडायचा असतो, हे साधं माहित नाही आणि हे राज्याचे शिक्षण मंत्री होते" अशी टीका हितेंद्र ठाकूर यांनी केली.

तावडेंनी 25 फोन केले, मला माफ कर, जाऊ द्या....हितेंद्र ठाकूरांचा दावा, पैसे वाटपाचं प्रकरण
Vindo Tawde
Follow us
| Updated on: Nov 19, 2024 | 1:44 PM

पैसे वाटपाच्या आरोपावरुन भाजपा आणि बाविआमध्ये नालासोपाऱ्यात तुफान राडा झाला आहे. भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेरलं आहे. सोबत भाजपचे नालासोपाऱ्याचे उमेदवार राजन नाईक आहेत. बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते विनोद तावडे यांना जाब विचारत आहेत. विरार पूर्वेला मनवेलपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये हा राडा सुरू आहे. वसई-विराराचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या सर्व राड्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “पाच कोटीच वाटप चालू आहे. मला डायऱ्या मिळाल्या आहेत. लॅपटॉप आहे. कुठे-काय वाटप झालय त्याची माहिती आहे” असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला.

“विनोद तावडे हे राष्ट्रीय नेते आहेत. राष्ट्रीय सरचिटणीस लाज-शरम कोळून प्याले आहेत. 48 तास आधी मतदारसंघ सोडायचा असतो, हे साधं माहित नाही आणि हे राज्याचे शिक्षण मंत्री होते” अशी टीका हितेंद्र ठाकूर यांनी केली. “त्यांनी मला 25 फोन केले. मला माफ कर, जाऊ द्या. प्लीज मला माफ कर. माझं चुकलं” असं विनोद तावडे म्हणाल्याच हितेंद्र ठाकूर यांनी दावा केला.

‘माझं फोन बुक बघा. किती इनकमिंग कॉल आहेत त्यांचे’

“भाजपचा राष्ट्रीय नेता पैसे वाटायला आलाय. पोलिसांनी कारवाई करावी, त्यानंतरच आम्ही सोडू. मी कायदे-नियम पाळणारा माणूस आहे” असं हितेंद्र ठाकूर म्हणाले. “माझं फोन बुक बघा. किती इनकमिंग कॉल आहेत त्यांचे. मला अगोदर न्यूज आलेली, विनोद तावडे पाच कोटी घेऊन येणार. डायऱ्या मिळाल्या आहेत, काय कायदेशीर कारवाई होते बघू” असं हितेंद्र ठाकूर म्हणाले.

‘मी त्यांना एकांतात भेटणार नाही’

“वसई रोड 5, वसई पश्चिम 4 असा त्या डायरीत उल्लेख आहे. 4 वाजता कुठे पैसे पोहोचवायचे हे सर्व त्यात लिहिलय. विनोद तावडे, राजन नाईक यांच्यावर नियमानुसार इलेक्शन अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अन्यथा उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यत ते माझ्यासोबतच इथे राहतील. मी त्यांना एकांतात भेटणार नाही. त्यांनी लोकांसमोर येऊन बोलावं” असं हितेंद्र ठाकूर म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.