हर्षवर्धन जाधवांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता
मनसेचे नेते आणि कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे (Atrocity Case on Ex MLA Harshavardhan Jadhav).
औरंगाबाद : मनसेचे नेते आणि कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे (Atrocity Case on Ex MLA Harshavardhan Jadhav). अॅट्रॉसिटी प्रकरणात औरंगाबादच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने हर्षवर्धन जाधव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
हर्षवर्धन जाधव यांच्यावर एका व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नुकताच त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल झाला आहे. हर्षवर्धन जाधव यांच्या जमिनीच्या प्लॉट शेजारी एक टपरी होती. ती टपरी काढण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी टपरी मालकाला जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप पीडित व्यक्तीने केला आहे. त्याने याविरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार देत जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणातील सतत वादग्रस्त ठरलेलं व्यक्तिमत्त्व आहे. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे असो किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशा अनेक मोठ्या राजकीय नेत्यांवर बेफामपणे आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.
कोण आहेत हर्षवर्धन ?
- हर्षवर्धन जाधव हे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.
- हर्षवर्धन जाधव हे 2009 मध्ये मनसेच्या तिकिटावर कन्नड विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते.
- मात्र पाच वर्षांच्या आत त्यांनी पक्षांतर्गत मतभेदामुळे मनसेला सोडचिठ्ठी दिली होती.
- त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला.
- 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही हर्षवर्धन जाधव यांना विजय मिळवता आला नाही.
- शिवसेनेच्या उदयसिंग राजपूत यांनी त्यांचा पराभव केला.
संबंधित बातम्या:
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Atrocity Case on Ex MLA Harshavardhan Jadhav