दहीहंडी किंवा श्रीकृष्ण हा काय राजकीय अजेंडा आहे का? बाळा नांदगावकरांचा गृहमंत्र्यांना सवाल

दहीहंडी किंवा श्रीकृष्ण हे राजकीय अजेंडा आहेत का? आम्ही काही केलं तर तो राजकीय अजेंडाच असतो का? तुम्ही काही करत असाल तर तो राजकीय अजेंडा ठरत नाही का? असे प्रश्न बाळा नांदगावकर यांनी केले आहेत.

दहीहंडी किंवा श्रीकृष्ण हा काय राजकीय अजेंडा आहे का? बाळा नांदगावकरांचा गृहमंत्र्यांना सवाल
Follow us
| Updated on: Sep 01, 2021 | 2:27 PM

मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारनं दहीहंडी आणि गणेशोत्सवासाठी निर्बंध लागू केले आहेत. असं असलं तरी भाजप आणि मनसे नेत्यांनी सरकारचे निर्बंध धुडकावून लावत दहिहंडी साजरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून मनसे नेत्यांवर कारवाई करण्यात आलीय. या कारवाईबाबत बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सवाल केलाय. आम्ही परंपरा पुढे नेत आहोत. दहीहंडी किंवा श्रीकृष्ण हे राजकीय अजेंडा आहेत का? आम्ही काही केलं तर तो राजकीय अजेंडाच असतो का? तुम्ही काही करत असाल तर तो राजकीय अजेंडा ठरत नाही का? असे प्रश्न बाळा नांदगावकर यांनी केले आहेत. ( Bala Nandgaonkar criticizes Thackeray government over Dahihandi festival)

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जे वक्तव्य केलं त्याचा सन्मान राखतो. पण त्यांनीही विचार केला पाहिजे. हिंदू म्हणून आमच्याही भावना आहेत. त्या व्यक्त करण्याचा आम्हालाही अधिकार आहे. मोहरम झाला तेव्हाही गृहमंत्र्यांनी भूमिका मांडली पाहिजे होती. तेव्हा कोर्टाचा आधार घेता. आम्हीही लोकांची काळजी घेऊ. पण राजकीय लग्न असताना कुणी काळजी घेत नाही. राणेंच्या घराबाहेर हजारो लोक जमले तेव्हा गृहमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली नाही, असा खोचक टोला नांदगावकर यांनी वळसे-पाटलांना लगावलाय.

अनधिकृत फेरिवाल्यावर कठोर कारवाईची मागणी

त्याचबरोबर ठाण्यात एका फेरिवाल्यानं केलेल्या हल्लात महिला अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यात संबंधित अधिकाऱ्याची दोन बोटं छाटली गेली आहे. त्यावर बोलताना फेरिवाल्यांविरोधात सरकारनं कारवाई केली पाहिजे. कायद्याची भीती त्यांना वाटली पाहिजे. अनधिकृत फेरिवाल्यांवर कारवाई गरजेची आहे. आमच्यावर दहिहंडी फोडली म्हणून कारवाई केली ना, मग अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या फेरिवाल्यांवर तर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही नांदगावकर यांनी यावेळी केलीय.

जखमी कल्पिता पिंपळेंना राज ठाकरेंचा शब्द

राज ठाकरे यांनी ठाणे महापालिकेच्या महिला अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे जखमी झाल्या आहेत. त्यांची दोन बोटं फेरीवाल्याने तोडली आहेत. फेरीवाल्यांवर कारवाई करताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. सध्या कल्पिता पिंपळे यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. राज ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली.

तब्बेतीच विचारपूस केली, लवकर बरे व्हा हे सांगायला आलो, बाकीचं आम्ही बघतो. अधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत फेरीवाले असे दोन प्रकार आहेत. आंदोलन जे होतं ते अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात होतं. जे काय घडलं त्याचं दु:ख आहेच, पण काळ सोकावतोय. अशाप्रकारची हिम्मत ठेचणं गरजेचं आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत, न्यायालयही योग्य न्याय देईल अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी त्यांची कारवाई केली, त्याला कठोर शिक्षा होईल असं वाटतंय, असं राज ठाकरे म्हणाले.

काय आहे प्रकरण?

ठाणे महापालिकेतील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे गेल्या होत्या. या कारवाईच्या दरम्यान 30 ऑगस्ट रोजी अमरजित यादव या फेरीवाल्याकडून त्यांच्यावर कोयत्याने अचानक हल्ला करण्यात आला. यावेळी बचावासाठी त्यांनी हात वर केल्याने त्यांची दोन बोटेच तुटून पडली, तर बचावासाठी धावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले आहे. कल्पिता पिंपळे यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी अमरजित यादव याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

इतर बातम्या :

राज ठाकरेंची पुन्हा परप्रांतीयविरोधी भूमिका? राज म्हणतात, बोटं छाटणारा बाहेर येऊ दे!

शिवसेना स्वतःचा नायलकपणा जोरकसपणे दाखवणारा एकमेव पक्ष : संदीप देशपांडे

Bala Nandgaonkar criticizes Thackeray government over Dahihandi festival

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....