बाळासाहेब सानपांनी केवळ दहा मिनिटात पुनर्प्रवेशाचा निर्णय कसा घेतला? फडणवीसांकडून ऐका

नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी मुंबईत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला

बाळासाहेब सानपांनी केवळ दहा मिनिटात पुनर्प्रवेशाचा निर्णय कसा घेतला? फडणवीसांकडून ऐका
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 1:46 PM

मुंबई : नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांनी शिवसेनेला धक्का देत पुन्हा भाजपचा हात धरला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत सानप यांनी मुंबईत भाजपप्रवेश केला. “महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्यामुळे पक्षात बाहेरील नेत्यांचे आगमन होणार असल्यांच्या पुंग्या सोडल्या जात आहेत. मात्र वेगवेगळ्या पक्षातून आलेले राजकीय नेते प्रगल्भ आहेत” असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. बाळासाहेब सानपांनी केवळ दहा मिनिटात पुनर्प्रवेशाचा निर्णय कसा घेतला? याचा किस्सा फडणवीसांनी सांगितला. सानप यांच्या पक्षप्रवेशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन, आशिष शेलार उपस्थित होते. (Balasaheb Sanap joins BJP again in presence of Devendra Fadnavis)

“दुरावलेले बाळासाहेब सानप भाजपमध्ये पुनर्प्रवेश करत आहेत. नाशिकमध्ये भाजपच्या वाटचालीत ज्यांचे परिश्रम आहेत, त्यात सानप येतात. काही समज-गैरसमजांमुळे अंतर निर्माण झाले, मात्र ते मनापासून आपल्यासोबतच होते. पक्षाचा एवढा मोठा नेता, ज्याच्या मनात पक्ष आहे त्यांना सोबत घ्यायला हवं, असं आम्हालाही वाटलं. आम्हाला काही निगोसिएशन्स करावी लागली नाहीत. निवडणुकीचा फॉर्म भरण्याच्या आधी आणि नंतरही आमचं बोलणं होत होतं. आमच्या सर्वांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे” असं फडणवीस म्हणाले.

“जुने-नवे वाद नाही”

“बाळासाहेब सानप यांनी केवळ दहा मिनिटात पुनर्प्रवेशाचा निर्णय घेतला. मला भाजपमध्येच रहायचं आहे. मी काहीही करण्यास तयार आहे, असं ते म्हणाले. गेली 35 वर्ष त्यांनी काम केलं, आणि पुढची 35 वर्ष आणि कायमच आपल्याला आनंदाने काम करायचं आहे. बाळासाहेब सानप हे जमिनीशी जोडलेले नेते आहेत. जुने-नवे असा कोणताही वाद नाही, ते जुनेच आहेत, फक्त नव्याने आलेले आहेत. नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला आहे.” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

“देशाचं भविष्य राहुल गांधी किंवा यूपीए नाही”

भाजपचे आमदार आमच्याकडे येणार, अशा वावड्या महाविकास आघाडीचे नेते उठवत राहतात. पण कुणीही पक्षात जाणार नाही. विरोधकांच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे ते पुंग्या सोडतात आणि त्यांच्या पुंग्या त्यांचीच लोक वाजवतात, असा टोला फडणवीसांना लगावला. मात्र वेगवेगळ्या पक्षातून आलेले राजकीय नेते प्रगल्भ आहेत. या देशाचं भविष्य राहुल गांधी किंवा यूपीए नाही, तर वर्तमान आणि भविष्यही पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत, याची त्यांना जाणीव आहे. एकत्र लढण्याचा तिन्ही पक्षांना तात्कालिक फायदा होईल, पण त्यांच्या राजकीय स्पेसमध्ये किती जण मावतील, यात शंकाच आहे. आणि ती स्पेस भाजपसाठी मोकळी असून आम्ही व्यापल्याशिवाय राहणार नाही, एखाद्या निवडणुकीत इकडे तिकडे झालं तर चिंता करायचे कारण नाही, असं फडणवीस म्हणाले.

येत्या काळात लोक आपल्याकडे येणार आहेत. त्यांना चांगल्या जबाबदारी आपण देणार आहोत, परिवारामध्ये छोटा वाद होतो पण ते परत एकत्र येतात. त्यामुळे सानप आपल्यासोबत आले आहेत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जुने मित्र पुन्हा एकत्र

दरम्यान, भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन यांनीही बाळासाहेब सानप यांचं पक्षात स्वागत केलं. आमचे जुने मित्र आणि जुने नेते पुन्हा एकत्र आल्याने आनंद आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा एकमताने भाजपला आणखी मोठं करण्यासाठी काम करु, असा मानस गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. (Balasaheb Sanap joins BJP again in presence of Devendra Fadnavis)

सानपांनी उत्तर महाराष्ट्राचं राजकारण करावं : चंद्रकांत पाटील

एका विचार आणि ध्येयाने झपाटलेली माणसं फार काळ दूर राहू शकत नाहीत. एका घटनेमुळे बाळासाहेब सानप दूर गेले. पण त्यांच्या मनात अस्वस्थता होती. पुन्हा इथेच जायचं आहे, हे त्यांना माहिती होतं. पण आता गैरसमज दूर झाले आहेत. या काळात ना कुणी पक्षाबाहेर गेलं, ना कुणाचा उत्साह कमी झाला. बाळासाहेब हे राज्याच्या पातळीवरील नेते असल्याने त्यांना चांगली जबाबदारी दोन तीन दिवसात जाहीर करेन. नाशिक महापालिकेसोबतच देवयानी फरांदे, जयकुमार रावल, गिरीश महाजन यांच्या साथीने सानप यांनी उत्तर महाराष्ट्राचं राजकारण करावं, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला.

रात गयी बात गयी, जुन्या गोष्टी उगाळण्यात अर्थ नाही. जे अशा घटना विसरतात, ते मोठे होतात. भाजप स्वबळावर निवडणुका लढवणार आहे. येत्या काळात चांगले लोक पक्षासोबत येऊन पक्ष मजबूत करतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

बाळासाहेब सानप यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. सानप यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्ष, तर वसंत गीते यांच्याकडे अखिल भारतीय ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्षपद दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपची ताकद वाढवण्यासाठी सानप यांनी गीते यांना मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जात असल्याचं कळतंय.

संबंधित बातम्या:

बाळासाहेब सानप यांचा भाजपप्रवेश; पालिका, पंचायत निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला धक्का

बाळासाहेब सानप पुन्हा भाजपात, काय आहे राजकीय जुगाड?

Balasaheb Sanap joins BJP again in presence of Devendra Fadnavis

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.