स्मृतीस्थळ शुद्धीकरणाचा वाद पेटला, भाजप नेते म्हणतात, शिवसेनेच्याच शुद्धीकरणाची गरज, का?

नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. त्यानंतर संध्याकाळी काही शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं! या प्रकरणानंतर आता भाजप आणि शिवसेनेतील वाद अधिक पेटल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसैनिकांनी स्मृतीस्थळांचं शुद्धीकरण केल्यानंतर भाजप नेत्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलीय.

स्मृतीस्थळ शुद्धीकरणाचा वाद पेटला, भाजप नेते म्हणतात, शिवसेनेच्याच शुद्धीकरणाची गरज, का?
प्रवीण दरेकर, आशिष शेलार, अतुल भातखळकर
Follow us
| Updated on: Aug 19, 2021 | 7:56 PM

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या जन-आशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. त्यानंतर संध्याकाळी काही शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं! या प्रकरणानंतर आता भाजप आणि शिवसेनेतील वाद अधिक पेटल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसैनिकांनी स्मृतीस्थळांचं शुद्धीकरण केल्यानंतर भाजप नेत्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केलीय. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेच्यात शुद्धीकरणाची गरज असल्याचा खोचक टोला लगावला आहे. तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकर यांनीही शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. (Praveen Darekar, Ashish Shelar, Atul Bhatkhalkar criticize ShivSena)

शिवसेनेच्यात शुद्धीकरणाची गरज, शेलारांचा टोला

शिवसेनेला शुद्धीकरण करण्यासाठी शुद्ध अस्तित्व आणि अधिष्ठान आहे का? असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी विचारलाय. कारण, सत्तेच्या लालसेपोटी ज्यांनी सोनिया गांधी यांच्या नावाने शपथ घेऊन काँग्रेसबरोबर सलगी केली, त्या शिवसेनेचंच मुळात शुद्धीकरण करण्याची गरज आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना ज्या छगन भुजबळांनी जेलमध्ये टाकलं त्यांच्याशी सत्तेसाठी सलगी करणाऱ्या शिवसेनेचंच शुद्धीकरण करण्याची गरज असल्याचा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

बाळासाहेब हे कुणाची खासगी मालमत्ता नाहीत- दरेकर

विनाशकाळे विपरीत बुद्धी… खरं तर नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दर्शनासाठी आले असता विरोध होता कामा नये. नारायण राणे हे बाळासाहेबांच्या हाताखाली घडलेला कार्यकर्ता आहेत. बाळासाहेब हयात असते तर त्यांनाही आनंदच झाला असता. मला वाटतं अशा प्रकारच्या मानसिकतेमुळं शिवसेना सहानुभूती मिळवण्यापेक्षा सहानुभूती गमावत आहे. अशी कृती सर्वसामान्य माणसाला किंवा बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या माणसाला आवडणार नाही. बाळासाहेब हे काही कुणाची खासगी मालमत्ता राहिलेले नाहीत. ज्याला आपण दैवत मानतो त्या व्यक्तीला तुम्ही विभागू शकत नाही. शिवसैनिकांची ही कृती योग्य नाही, अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

अतुल भातखळकरांचा हल्लाबोल

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय. ‘शिवसेनाप्रमुखांना राहुल गांधी आदरांजली वाहत नाहीत, तरी त्यांच्या मांडीवर बसता. शिवसेनाप्रमुखांना अटक करणाऱ्या लखोबाच्या गळ्यात गळे घालता. शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यभर ज्यांचा उद्धार केला त्या सोनिया मातोश्रींना मुजरे करता… उद्धवजी शुद्धीकरण खरेतर शिवसेनेचे करण्याची गरज आहे’, असं ट्वीट करत भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावला आहे.

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी नेमकं काय घडलं?

नारायण राणे यांनी सकाळी शिवाजी पार्क इथं जात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेत अभिवादन केलं. त्यानंतर संध्याकाळी काही शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करण्यात आलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर गोमुत्रा शिंपडून, दुधाचा अभिषेक शिवसैनिकांनी घातला. दुपारी नारायण राणे यांनी स्मृतीस्थळावर आले होते. त्यामुळे हा परिसर अशुद्ध झाला, असं या शिवसैनिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे संध्याकाळी काही शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

संबंधित बातम्या :

‘मातोश्री’च्या अंगणात काट्याची टक्कर, अटीतटीच्या लढतीत हरवलं, आता स्वत: तृप्ती सावंतांकडून नारायण राणेंचं स्वागत!

32 वर्षांचा पापाचा घडा फोडणार, बाळासाहेबही म्हणाले असते, नारायण अशीच प्रगती कर : नारायण राणे

Praveen Darekar, Ashish Shelar, Atul Bhatkhalkar criticize ShivSena

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.