Solapur : सोलापुरातही बॅनर ‘वॉर’, आरोग्य मंत्री नंतरचा सावंताचा पहिलाच दौरा वादाच्या भोवऱ्यात..!

पंढरपूर तालुक्यातील आरोग्य विभागाचा आढावा घेऊन मंत्री तानाजी सावंत हे आता सोलापुरातील शासकीय विश्रामगृहामध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे या परिसरात सावंत समर्थकांकडून त्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Solapur : सोलापुरातही बॅनर 'वॉर', आरोग्य मंत्री नंतरचा सावंताचा पहिलाच दौरा वादाच्या भोवऱ्यात..!
सोलापुरात बॅनरवरुन तानाजी सावंत आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये बाचाबाची झाली
Follow us
| Updated on: Sep 05, 2022 | 8:16 PM

सोलापूर :  (Tanaji Sawant) आ. तानाजी सावंत यांना आरोग्यमंत्री पद मिळाल्यानंतर ते प्रथमच (Solapur District) सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांनी प्रथम पंढरपूर तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन तेथील आढावा घेतला. दरम्यान, माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री ज्या मार्गावरुन गेले तिथे गोमुत्र शिंपडून त्या मार्गाचे शुद्धीकरण केले. तर आता सावंत हे सोलापूर शहरात दाखल होण्यापूर्वीच नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर हे विनापरवाना असल्याने (Solapur Police) पोलिसांनी ते हटवले आहेत. यावरुन तानाजी सावंत यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला आहे. मंत्री झाल्यानंतर सावंत हे प्रथमच सोलापुरात येत असल्याने येथील शासकीय विश्रामगृहासमोर स्वागताचे बॅनर लावले होते. त्यावरुन वाद निर्माण झाला आहे.

पोलिसांचे नेमके म्हणणे काय?

पंढरपूर तालुक्यातील आरोग्य विभागाचा आढावा घेऊन मंत्री तानाजी सावंत हे आता सोलापुरातील शासकीय विश्रामगृहामध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे या परिसरात सावंत समर्थकांकडून त्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र, यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाकडून हे बॅनर हटवण्यात आले आहेत. याचाच राग सावंतांच्या समर्थकांमध्ये आहे.

परवानगी जाणीवपूर्वक नाकारली

आरोग्यमंत्री प्रथमच सोलापूर शहरात येत असल्यामुळे त्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यासाठी परवानगी मागितल्याचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी सांगितले. मात्र, असे असतानाही परवानगी नाकरल्याने हे बॅनर लावले होते. पोलिस प्रशासनाकडून जाणीवपूर्वक परवानगी नाकारल्याचा आरोप काळजे यांनी केला आहे. गणेश उत्सवाचे कारण सांगून ही परवानगी नाकारली होती. आतापर्यंत शिवसेना पदाधिकारी आणि शिंदे गट समर्थक यांच्यात मतभेद पाहवयास मिळाले होते. पण सोलापुरात प्रशासन आणि सावंत समर्थक यांच्यामध्ये वाद पाहवयास मिळाला आहे.

नातेपुतेमध्ये युवा सेनेकडून निषेध

आरोग्य विभागाचा आढावा घेण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे दाखल झाले होते. ग्रामीण रुग्णालयाती आढावा घेऊन ते पंढरपुराकडे मार्गस्थही झाले. पण ते ज्या मार्गाने आले तो रस्ता देखील अशुध्द झाल्याचा ठपका ठेवत युवा सेनेच्यावतीने त्या रस्त्याचे शुद्धीकरण करण्यात आले. यावेळी युवा सेना सोलापूर जिल्हा प्रमुख गणेश इंगळे, अमोल उराडे,रुपेश लाळगे, अमित भरते उपस्थित होते.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....