बारामतीत बोंबाबोंब आंदोलन! ‘वीजबिल माफ करा’, भाजपचं बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर निदर्शनं

Baramati Ajit Pawar Home : भाजप कार्यकर्त्यांनी बारामतीत मुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी या बारामतीमधील घरासमोर निदर्शनं केली. त्यानंतर महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर देखील या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला.

बारामतीत बोंबाबोंब आंदोलन! 'वीजबिल माफ करा', भाजपचं बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर निदर्शनं
अजित पवारांच्या घराबाहेर भाजपचं आंदोलनImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 3:56 PM

बारामती : बारामतीमध्ये भाजपनं अजित पवारांच्या (Baramati Ajit Pawar) निषेधात निदर्शनं केलं आहे. वीज बिलाच्या माफीच्या मागणीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. बारामतीमधील अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. वीज बिलाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांचा वीज (Electricity) पुरवठा खंडीत करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. तसेच राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी बारामतीत मुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी या बारामतीमधील घरासमोर निदर्शनं केली. त्यानंतर महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर देखील या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला.

वीजबिलाविरोधात भाजप आक्रमक

ढोल वाजवून आणि घोषणाबाजी करत यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याविरोधान आंदोलन केलं. वीज बिलं भरली नसल्याने शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा सपाटा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लावला आहे. यामुळे शेतकरी संतप्त झालेत. या विरोधात राज्यभर भाजपच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत.

बारामतीमध्येही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर राज्य सरकारच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर या कार्यकर्त्यांनी बोंबाबोंब करत वीजबिले माफ करण्याची मागणी केली.

अजित पवारांना इशारा

यावेळी शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करुन वीज पुरवठा पूर्ववत करावा अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा बारामती तालुका अध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी दिलाय. शेतकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे निवडून येणाऱ्या अजित पवार यांनी शेतकऱ्यांचा अडचण आणि प्रश्न समजून घेऊन तातडीनं वीज बिलं माफ करावीत, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी केली आहे. इतकंच नाही, तर वेळीच योग्य पावलं उचलली नाहीत, तर शेतकऱ्यांच्या जीवावर निवडून येणाऱ्या अजितदादांना शेतकरी एक दिवस घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत, असंही म्हटलंय.

संबंधित बातम्या :

पुण्यात विद्यार्थ्याला मारहाण, 50 हजारांची लूट, बेसबॉल बॅटने कार फोडली

Video: आप कहाँ से, सर महाराष्ट्र, अच्छा, माझे वंशजही, यूक्रेनमध्ये ज्योतिरादित्य शिंदेंचा मराठी बाणा

अजितदादांच्या पीएशी ओळख असल्याचा बनाव, पुण्यात तरुणाला दहा लाखांचा गंडा

पाहा व्हिडीओ :

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.