माजी नगराध्यक्ष भेटीला, शरद पवारांचा पहिला प्रश्न “बारामतीकर ठीक आहेत ना?”

दिवसाला किमान 300 ते 400 रुग्ण आढळत असल्याने बारामतीकरांसह प्रशासनाचीही चिंता वाढली होती (Baramati Sharad Pawar Corona Situation)

माजी नगराध्यक्ष भेटीला, शरद पवारांचा पहिला प्रश्न बारामतीकर ठीक आहेत ना?
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 10:24 AM

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे शस्त्रक्रियेनंतर मुंबईत विश्रांती घेत आहेत. मात्र याही स्थितीत त्यांचं लक्ष बारामतीकडे असल्याचं एका प्रसंगातून पहायला मिळालं. बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांनी पवारांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी बारामतीतील कोरोना स्थितीची माहिती घेत बारामतीकरांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. (Baramati Former Nagaradhyaksha Sadashiv Satav meets Sharad Pawar later enquires about Corona Situation)

बारामतीत मागील दोन महिन्यात कोरोनानं हैदोस घातला आहे. दिवसाला किमान 300 ते 400 रुग्ण आढळत असल्याने बारामतीकरांसह प्रशासनाचीही चिंता वाढली होती. या पार्श्वभूमीवर बारामतीत पाच मेपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामध्ये केवळ औषधाची दुकानं आणि रुग्णालयं सुरु आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.

शस्त्रक्रियेनंतरही पवारांना बारामतीकरांची काळजी

या काळात शरद पवार यांनी दोन वेळा बारामतीकरांसाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले होते. त्याच वेळी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाल्या. त्यामुळे ते सध्या मुंबईतील सिल्व्हर ओक भागातील निवासस्थानी विश्रांती घेत आहेत. या काळातही ते बारामतीच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

“लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णसंख्येत फरक पडला का?”

बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी बारामतीतील कोरोना स्थितीबद्दल माहिती घेतली. बारामतीत कोरोना निर्मूलनाबद्दल सुरु असलेल्या उपाययोजनांबद्दल माहिती घेतानाच लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णसंख्येत काही फरक पडला का, याबद्दलही त्यांनी विचारपूस केली. एवढ्यावरच न थांबता बारामतीत आरोग्य यंत्रणा राबवताना कसलीही मदत लागली तरी त्याबद्दल तत्पर निर्णय घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

एकूणच काय तर शरद पवार हे स्वत: मागच्या महिन्याभरात दोन शस्त्रक्रियांना सामोरे गेले आहेत. याही स्थितीत त्यांचं बारामतीवर बारकाईने लक्ष आहे. त्यामुळेच घार उडते आकाशी, चित्त तिचं पिलांपाशी या म्हणीची प्रचितीच या निमित्तानं अनुभवायस मिळाली.

संबंधित बातम्या :

आपण सगळे घाटी होतो, मुंबईतील फेरफटक्यादरम्यान शरद पवार-सुप्रिया सुळेंचा संवाद

कोरोनाची गावखेड्यात धडक! बारामती, माळेगाव हद्दीतील गावांमध्ये हाय अलर्ट जारी

(Baramati Former Nagaradhyaksha Sadashiv Satav meets Sharad Pawar later enquires about Corona Situation)

सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.