सुप्रिया सुळे यांचे अजित पवार यांना चॅलेंज, तुम्ही म्हणतील ती जागा, वेळ अन् ठिकाण

Supriya Sule and Ajit Pawar | अजित पवार यांचे उत्तर बाळबोध आहे. माझ्यासाठी संसद ही लोकशाहीचे मंदिर आहे. देशाची पॉलिसी ही भाषण करूनच ठरते. अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर मला वेदना झाल्या. लोकशाहीवर हा अविश्वास आहे.

सुप्रिया सुळे यांचे अजित पवार यांना चॅलेंज, तुम्ही म्हणतील ती जागा, वेळ अन् ठिकाण
Follow us
| Updated on: Feb 18, 2024 | 7:36 AM

संदीप राजगोळकर, नवी दिल्ली, दि. 18 फेब्रुवारी 2024 | लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट लढत होणार आहे. पवार कुटुंबामधील बंडानंतर सर्व राज्याचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांची जोरदार तयारी सुरु झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बारामतीतून त्या उभ्या राहणार आहेत. सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी प्रचाराला सुरुवातही केली आहे. त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय लढताना दिसणार आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी अजित पवार यांना थेट आव्हानच दिले. बारामतीत माझ्यासारखा तगडा उमेदवार द्या, मग ते म्हणतील ती जागा, ते म्हणतील ते ठिकाण आणि ते म्हणतील ती वेळ. मी चर्चेस तयार आहे, असे आव्हान सुप्रिया सुळे यांनी दिले.

अजित पवार यांचे उत्तर बाळबोध

अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना संसद रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल टीका केली होती. त्याला जोरदार प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले. अजित पवार यांचे उत्तर बाळबोध आहे. माझ्यासाठी संसद ही लोकशाहीचे मंदिर आहे. देशाची पॉलिसी ही भाषण करूनच ठरते. अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर मला वेदना झाल्या. लोकशाहीवर हा अविश्वास आहे. लोकशाहीत माझ्या विरोधात कुणीही उभा राहिले पाहिजे. माझ्यासारखा कोणी तगडा उमेदवार असेल तर मी कुठेही चर्चा करायला तयार आहे, असे सुळे यांनी म्हटले.

बारामतीकर काय म्हणतात…

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या लढतीची चर्चा रंगली आहे. त्यावर बारामतीकरांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. बारामतीकर म्हणतात खादारकीला सुप्रिया सुळे विधानसभेला दादा. तर काही म्हणतात दोघे ही चांगले आहेत. उगवत्या सूर्याला नमस्कार घालताना मावळत्या सूर्याला विसरायचं नसते. बारामतीमधील युवक म्हणतात आम्ही दादांच्या रुपात मुख्यमंत्री पाहतो.

हे ही वाचा

सुनेत्रा पवार यांचा पैठणीचा खेळ अन् अजित पवार यांच्यावर असा घेतला उखाणा Video

Non Stop LIVE Update
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?.
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?.
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा.
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला.
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका.
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला.
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?.
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या....
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट.