2014 ला पवार कुटुंबाची धाकधूक वाढवणारे तीन विधानसभा मतदारसंघ

बारामती : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील 14 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये काही हायप्रोफाईल लढती आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे बारामती. बारामतीची जागा जिंकायचीच असा निर्धार करत भाजपने प्रचंड मोठी यंत्रणा या मतदारसंघात कामाला लावत राष्ट्रवादीला आणि पर्यायाने पवार कुटुंबाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन […]

2014 ला पवार कुटुंबाची धाकधूक वाढवणारे तीन विधानसभा मतदारसंघ
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

बारामती : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील 14 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये काही हायप्रोफाईल लढती आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे बारामती. बारामतीची जागा जिंकायचीच असा निर्धार करत भाजपने प्रचंड मोठी यंत्रणा या मतदारसंघात कामाला लावत राष्ट्रवादीला आणि पर्यायाने पवार कुटुंबाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देत भाजपने राष्ट्रवादीपुढे आव्हान निर्माण केलं. मागील निवडणुकीत मोदी लाट असताना राष्ट्रवादीच्या विद्यमान उमेदवार सुप्रिया सुळे यांना 70 हजाराचं मताधिक्य मिळालं होतं. मात्र आता या मताधिक्क्यालाच घरघर लावण्याची तयारी भाजपकडून करण्यात आली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने प्रचंड मोठी यंत्रणा राबवली. त्यांच्याकडून पवारांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात आलं. कोणत्याही परिस्थितीत पवारांच्या अभेद्य गडाला छेद द्यायचाच ही भूमिका भाजपची राहिली. त्याचवेळी राष्ट्रवादीने मात्र संयम ठेवत विकासासह भाजपच्या चुकीच्या धोरणांवर आवाज उठवला. पण पवार कुटुंबाला यामध्ये मोठी मेहनत करावी लागली हे देखील बारामतीकरांनी पाहिलंय.

शरद पवारांनीही जातीने लक्ष घातलं

शरद पवार बारामती मतदारसंघात एकच सांगता सभा घेत. बाकीचा संपूर्ण वेळ इतर मतदारसंघातील उमेदवारांना देत असत. मात्र यावेळी शरद पवारांनी दौंड तालुक्यात एकाच दिवशी तीन सभा, तर अजित पवार यांनी एकाच  दिवशी केवळ बारामती तालुक्यात सहा गावात जाहीर सभा घेतल्या. सुप्रिया सुळे या तर एका दिवशी तीस गावांना भेटी देत होत्या. यावरून पवार कुटुंबाला प्रथमच जास्तीचे लक्ष घालणे भाग पडले आहे. मात्र आमच्या कामाच्या जोरावर आणि मतदारसंघातील घराघरात पोहोचल्यामुळे ही निवडणूक मी जिंकणारच असा दावा आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केला.

2014 च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना बारामती, इंदापूर, पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघात मताधिक्क्य मिळून त्यांनी महादेव जानकर यांचा पराभव केला. तर जानकर यांना अनपेक्षितपणे दौंड, खडकवासलामधून आघाडी मिळाली होती. मात्र आता परिस्थिती बदलली असली तरी भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी देत भाजपची मोठी यंत्रणा या मतदारसंघात उतरवत राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.

मतभेद दूर करुन काम करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

भाजपकडून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी बारामतीतच तळ ठोकत राष्ट्रवादीविरोधात मोठी यंत्रणा राबवली. असं असलं तरी सद्यस्थितीत इंदापूर, भोर आणि पुरंदर या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादीत असलेले मतभेद दूर झाले आहेत. त्यामुळे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार संग्राम थोपटे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात आघाडी घेतली. त्याचे परिणाम या निवडणुकीत पाहायला मिळणार आहेत. त्याचवेळी बारामतीतही मागील वेळीपेक्षा सुप्रिया सुळे यांचे मताधिक्क्य वाढवण्याचा निर्धार राष्ट्रवादीने केलाय.

2014 चा मतदारसंघनिहाय निकाल

इंदापूर तालुका मतदान  

सुप्रिया सुळे – 87150

महादेव जानकर – 65492

(सुप्रिया सुळेंना 21658 ची आघाडी)

बारामती तालुका मतदान  

खासदार सुप्रिया सुळे – 142628

महादेव जानकर – 52085

(सुप्रिया सुळे यांना 90543 मतांची आघाडी)

भोर तालुका मतदान  

खासदार सुप्रिया सुळे – 90915

महादेव जानकर – 74030

(सुप्रिया सुळे यांना 16885 मतांची आघाडी)

दौंड तालुका मतदान  

खासदार सुप्रिया सुळे – 57289

महादेव जानकर – 82837

(महादेव जानकरांना 25528 मतांची आघाडी)

पुरंदर तालुका मतदान  

खासदार सुप्रिया सुळे – 72431

महादेव जानकर – 78667

(महादेव जानकरांना 6065 मतांची आघाडी)

खडकवासला तालुका मतदान  

खासदार सुप्रिया सुळे – 70602

महादेव जानकर – 98729

(महादेव जानकरांना 28127 मतांची आघाडी)

अंतिम निकाल

खासदार सुप्रिया सुळे : 521562 मतं, 69719 मतांनी विजयी

महादेव जानकर (रासप) 457843 मतं

सुरेश खोपडे (आप) 26396 मतं

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.