Baramati loksabha Election 2024 : ‘वहिनी आईसमान वाटते, मग सुप्रिया ताई तुम्ही…’ भाजपा नेत्याचा सल्ला
"पवार कुटुंबाने अजितदादांना एकट पाडलय. वाऱ्यावर सोडलय. याच बारामतीच्या जनतेला वाईट वाटतय. त्याच प्रतिबिंब मतात उमटेल" बारामतीमध्ये यंदा पवार कुटुंबातच सामना आहे. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना रंगणार आहे.
“आपली मोठी वहिनी आईसमान असल्याच सुप्रिया सुळे सांगत आहेत. भाजपा घरफोड्या करत असल्याचा आरोप त्या करतात. सुप्रिया ताई महाराष्ट्रातील जनतेला नीट माहित आहे, फोडाफोडीच राजकारण करणारा नेता या राज्यात कोण आहे?. ज्याने या महाराष्ट्रात अनेक घर फोडली. तो घरफोड्या कोण? हे महाराष्ट्राला नीट माहिती आहे. जर तुम्हाला वहिनी आईसमान वाटतात. मग तुम्ही आई विरोधात निवडणूक नका लढवू” असं भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
“तुम्ही आईला त्या ठिकाणी समर्थन दिल पाहिजे. एकीकडे आई समान बोलायच आणि दुसरीकडे टीका करायची. भावनिक माहोल करायचा हा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे” अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली. “लोकसभा निवडणुकीत देशातल्या, मतदारसंघातल्या प्रश्नावर बोललं पाहिजे. पण आता मोदी साहेब, केंद्र सरकारवर टीका करायला काही नाहीय” असं प्रवीण दरेकर म्हणाले.
बारामतीच्या जनतेला कसलं वाईट वाटतय?
“अजित पवार यांचं कतृर्त्व मोठ आहे. त्यांच्या कतृर्त्वाला आव्हान देता येत नाहीय. त्यांनी केलेलं विकासकाम डोंगराएवढ आहे. पवार कुटुंबाने अजितदादांना एकट पाडलय. वाऱ्यावर सोडलय. याच बारामतीच्या जनतेला वाईट वाटतय. त्याच प्रतिबिंब मतात उमटेल. बारामतीकर अजितदादांच कुटुंब म्हणून त्यांच्या पाठिशी उभ राहतील” असा विश्वास प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. बारामतीमध्ये यंदा पवार कुटुंबातच सामना आहे. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना रंगणार आहे.