तर मुंबईतून बाहेर पडू देणार नाही, बार्शीच्या आमदाराला ठार मारण्याची धमकी
भाऊसाहेब आंधळकर (Bhausaheb Andhalkar) यांच्याविरोधात राजकारण कराल तर मुंबईतून बाहेर पडू न देण्याची धमकी देण्यात आली आहे.
सोलापूर : बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत (Barshi MLA Rajendra Raut) यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आमदार राजेंद्र राऊत यांचे स्वीय सहायक प्रशांत खराडे यांना ही धमकी कळवण्यात आली. शिवसेना नेते आणि माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर (Bhausaheb Andhalkar) यांच्याविरोधात राजकारण कराल तर मुंबईतून बाहेर पडू न देण्याची धमकी देण्यात आली आहे. पनवेल येथील नंदू उर्फ बाबा पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्यात भांदवि ५०७ कलम नुसार गुन्हा दाखल झाला आहे. (Barshi MLA Rajendra Raut threatened to kill case register against close aid of Bhausaheb Andhalkar)
राजेंद्र राऊत हे अपक्ष आमदार आहेत. आमदार राऊत आणि भाऊसाहेब आंधळकर यांचं वैर सर्वश्रुत आहे. या दोघांचे कार्यकर्ते गेल्यावर्षी हाणामारीवर उतरले होते. मागील अनेक निवडणुकांमध्ये राजेंद्र राऊत आणि भाऊसाहेब आंधळकर यांनी एकमेकांना आव्हान दिलं होतं. भाऊसाहेब आंधळकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण केलं. त्यानंतर सोलापूर आणि विशेषत: बार्शीतील राजकीय राडेबाजी आणखी वाढल्याचं चित्र आहे.
कोण आहेत राजेंद्र राऊत?
– सोलापूर जिल्ह्यातील अपक्ष आमदार
– राजेंद्र राऊत बार्शी मतदारसंघातून विधानसभेवर
– 2004 मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर आमदार
– 2019 मध्ये शिवसेना उमेदवार आणि माजी आमदार दिलीप सोपल यांचा राजेंद्र राऊतांकडून पराभव
– सहा वेळा आमदारकी भूषवलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप सोपल यांचा पराभव
– 2019 मध्ये अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले राजेंद्र राऊत विजयी
2019 ची निवडणूक
बार्शी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दिलीप सोपल विरुद्ध भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत असा सामना झाला. यामध्ये राजेंद्र राऊत यांनी बाजी मारली. शिवसेनेच्या दिलीप सोपल यांना त्यावेळी भाजपाचे राज्यमंत्री दर्जा असलेले राज्य गृहनिर्माण संस्थेचे सदस्य राजेंद्र मिरगणे यांचा पाठिंबा होता. विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीतून आलेल्या सोपल यांच्या सांगण्यावरून राजेंद्र मिरगणे यांनी लढवल्याचा आरोप राऊत यांनी केला. त्यावेळी राजेंद्र राऊत आणि राजेंद्र मिरगणे यांचाही वाद चांगलाच उफाळला होता. (Barshi Independent MLA Rajendra Raut)
शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर दहा वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना बार्शीच्या तळागाळात रुजविण्याचे काम आंधळकर यांनी केलं. 2019 च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी जाहीर होईल असं वाटत असतानाच राष्ठ्रवादीच्या दिलीप सोपलांनी थेट मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधून घेतलं. सोपलांच्या राष्ट्रवादी सोडल्याने बार्शीत राष्ट्रवादीला खिंडार पडलं, तर शिवसेनेतही अंतर्गत वाद उफाळून आला. थेट बंडाची भाषा करण्यात आली. यासर्वांमध्ये भाऊसाहेब आंधळकर हे आघाडीवर होते. मात्र, त्याच आंधळकरांनी थेट दिलीप सोपलांच्या मागे राहू, असं सांगत प्रचाराचा नारळ फोडण्याचा आग्रह केला आणि सोपलांनी तो पूर्णही केला.
संबंधित बातम्या
आयुष्यभर ढोलकी आणि तमाशाच्या सानिध्यात राहणाऱ्यांनी मला शिकवू नये : माजी आमदार राजेंद्र राऊत
फडणवीसांचा निकटवर्तीय अपक्ष आमदार पवार-ठाकरेंना भेटणार
VIDEO : काही दिवसापूर्वी भाऊसाहेब आंधळकर यांच्या कार्यालयावर दगडफेक झाली होती
(Barshi MLA Rajendra Raut threatened to kill case register against close aid of Bhausaheb Andhalkar)