Modi Government | तयार राहा… ऑगस्टपर्यंत मोदी सरकार कोसळणार, बड्या नेत्याने केला दावा

दिल्लीतील मोदी सरकार खूप कमकुवत आहे. हे सरकार ऑगस्टपर्यंत पडू शकते. हे पाहता मी सर्व कार्यकर्त्यांना सांगतो की, निवडणुकीची तयारी ठेवा कारण निवडणुका कधीही होऊ शकतात.

Modi Government | तयार राहा... ऑगस्टपर्यंत मोदी सरकार कोसळणार, बड्या नेत्याने केला दावा
pm modi. lalu prasad yadavImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 7:53 PM

दिल्लीतील मोदी सरकार अत्यंत कमकुवत आहे. हे सरकार ऑगस्टपर्यंत पडू शकते. हे लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी ठेवावी. सत्तेच्या लालसेपोटी जेडीयूने आपल्या विचारसरणीशी तडजोड केली. RJD हा एकमेव असा पक्ष आहे ज्याने भाजपपुढे तडजोड केली नाही किंवा शरणागती पत्करली नाही. दिल्लीतील मोदी सरकार ऑगस्टपर्यंत पडू शकते. त्यामुळे कार्यकर्त्यांना सांगतो निवडणुकीची तयारी ठेवा. कारण निवडणुका कधीही होऊ शकतात, असा दावा RJD प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांनी केला आहे. पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी हा मोठा दावा केला.

आरजेडी पक्षाच्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमात खासदार तेजस्वी यादव यांनी भाजप आणि नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सत्तेत असणे ही सर्वात मोठी गोष्ट नाही. आम्ही गरीब आणि वंचितांसाठी लढत आहोत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमची मते 9 टक्क्यांनी वाढली आहे. तर, एनडीएच्या मतांची टक्केवारी 6 टक्क्यांनी कमी झाली आहे. आरजेडीला 4 जागा मिळाल्या आहेत. आम्ही आणखी जागा जिंकू शकलो असतो. मात्र, या निवडणुकीत आमच्या आघाडीने 9 जागा जिंकल्या आहेत असे ते म्हणाले.

राज्यातील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर हल्लाबोल करताना तेजस्वी म्हणाले की, लोक म्हणतात की डबल इंजिनचे सरकार आहे. सुमारे 20 दिवसात 1 डझनहून अधिक पूल कोसळले आहेत. अनेक रेल्वे अपघात झाले आहेत. बिहारमध्ये गुन्हेगारी शिगेला पोहोचली आहे. पेपर फुटतोय. एवढे सगळे होऊनही डबल इंजिन सरकारचे लोक यावर बोलायला तयार नाहीत अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.

तेजस्वी यादव पुढे म्हणाले, हे लोक बोलतात तेजस्वीने सर्व काही केले आहे. मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांना आव्हान देतो की, पडलेल्या पुलांच्या मंजुरी, टेंडर, पायाभरणी आणि उद्घाटनाची तारीख जाहीर करा. सर्व काही दुधाचे दूध आणि पाणी होईल, असे आव्हान त्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना दिले.

Non Stop LIVE Update
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय
रायगडाच्या सर्व वाटा बंद, पायऱ्यांवरुन पाण्याचे लोट, सरकारचा निर्णय.
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना...
जरांगेंनी केली चंद्रकांतदादांची नक्कल,'म्हणाले फडणवीस साहेब त्यांना....
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी
विधान परिषद निवडणूकीत दगाफटका होण्याची भीती, आमदारांची हॉटेलवारी.
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत
'शिवप्रेमींची फसवणूक...खरी वाघनखं येथे आहेत - इतिहास अभ्यासक इंद्रजीत.
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी....
परब म्हणाले तुम्हाला असं म्हटलं तर ?, उपसभापतींची मग अखेर दीलगिरी.....
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर
'मुंबईकरांनी आपली काळजी घ्यावी, कारण...,' काय म्हणाले होसाळीकर.
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय
म्हणून मुंबई तुंबली, काय म्हणाले अजित पवार, ग्लोबल वार्मिंग..आणि काय.
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन
राजापूरात पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका, पोलीसांचे रेस्क्यू ऑपरेशन.
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा
मुंबईची झाली तुंबई, मुख्यमंत्र्यांनी घेतला कंट्रोल रुमचा ताबा.
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी
पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा बळी.