Suresh Dhas : संतोष देशमुख प्रकरणात मोठा गौप्यस्फोट, त्या दिवशी व्हिडीओ कॉल करून… सुरेश धस यांचा खळबळजनक दावा काय?

Suresh Dhas : "अनेकांना मारलं. किशोर फड, गर्जे किती नावं घेऊ. एकादमात नावं घेता येत नाही. किती तरी नावे आहेत. आता नाही बोललं तर केजवरून आष्टीतही येतील. वकील ही यांचेच. वकीलही हेच फोडायचे. साक्षीदारही यांचेच. हे उद्योग फार झाले आहेत" असा आरोप सुरेश धस यांनी केला.

Suresh Dhas : संतोष देशमुख प्रकरणात मोठा गौप्यस्फोट, त्या दिवशी व्हिडीओ कॉल करून... सुरेश धस यांचा खळबळजनक दावा काय?
Suresh Dhas
Follow us
| Updated on: Dec 26, 2024 | 1:11 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येवरुन राजकारण तापलं आहे. बीड जिल्ह्यात संतापाची, रोषाची भावना आहे. विरोधी पक्षाकडून सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आरोप होत आहेत. आता बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना काही गौप्यस्फोट केले आहेत. तुम्ही नाव का घेत नाही, तुमच्यावर दबाव आहे का? असा प्रश्न सुरेश धस यांना विचारण्यात आला, त्यावर ते म्हणाले की, “मी आता नाव घेणार नाही. आकाच्या आदेशाशिवाय हे होऊ शकत नाही. आकाच्या गाड्या सर्व विष्णू चाटेच्या नावावर आहेत. विष्णू चाटेच आदेश देत होता. विष्णू चाटे आदेश देत असताना आकाशी बोलत होता. त्याला कसं मारतोय, कसं क्रुरतेने मारतोय हे व्हिडीओ कॉल करून दाखवलं आहे. हे आकाला आणि विष्णू चाटेलाही दाखवलं असेल, हे मला शंभर टक्के वाटतं” असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला.

“मी कधीच कुणाला घाबरलो नाही. माझं स्टेटमेंट ही झालं आहे. भीती बिती, दहशत आणि यांच्या आकाला मी घाबरत नाही. तो प्रश्न नाही. आकापर्यंत मी पोहोचलोय. आकाशिवाय ही बाब होऊ शकत नाही. आकाचे नाव मी का घेऊ माझ्या तोंडाने. तपास होईल. मोठ्या आकांच नाव आलं, तर घेईन मी. हे फक्त परळीपर्यंत घडत होतं. आता त्यांनी कार्यक्षेत्र वाढवलं. केजपर्यंत आले. खंडणी, अपहरणाचं कार्यक्षेत्र त्यांनी बीडपर्यंत वाढवलं. त्यांनी त्यांचं मंत्रिपद भाड्याने दिलं. जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भाड्याने दिलं. लीज करार झाल्याने खाली बघितलंच नाही काम कसं चाललं. त्यामुळे हे घडत गेलं” असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला.

‘आणखी जोर लावून आका पटकन पकडावा हीच अपेक्षा’

“आता टोकाचं झालं. परमोच्च बिंदू झाला. शिशुपालाचे 99 टक्के भरले. त्यामुळे श्रीकृष्णाने त्याला मारलं. यांचे 99 अपराध झाले. देशमुख यांच्या हत्येने शंभर झाले. अनेकांना मारलं. किशोर फड, गर्जे किती नावं घेऊ. एकादमात नावं घेता येत नाही. किती तरी नावे आहेत. आता नाही बोललं तर केजवरून आष्टीतही येतील. वकील ही यांचेच. वकीलही हेच फोडायचे. साक्षीदारही यांचेच. हे उद्योग फार झाले आहेत” असा आरोप सुरेश धस यांनी केला. “फडणवीस यांनी जोर लावलेला आहे. आणखी जोर लावून आका पटकन पकडावा हीच अपेक्षा आहे. लोकांमध्ये असंतोष झाला आहे. याला आमचे साहेब माफ करतील असं नाही. फडणवीस राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी ठरवलंय, त्यामुळे आका ताब्यात यावा ही मागणी आहे” असं सुरेश धस म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.