Shivajirao Adhalrao Patil : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांवरील कारवाई मागे, शिवसेनेकडून अनावधानानं बातमी दिल्याची सारवासारव

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. दरम्यान, आढळराव पाटलांवरची कारवाई मागे घेण्यात आली असून हे वृत्त शिवसेनेचे मुख्यपत्र असलेल्या सामनातून अनावधानानं दिल्या गेल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेकडून सारवासारव केल्याचं उघड झालंय

Shivajirao Adhalrao Patil : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांवरील कारवाई मागे, शिवसेनेकडून अनावधानानं बातमी दिल्याची सारवासारव
शिवाजीराव आढळराव पाटीलImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 11:49 AM

मुंबई : शिवसेनेतून (shivsena) बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटानं वेगळीवाट पकडल्यानं सेनेत हकालपट्टीचं सत्र सुरू झाल्याचं दिसतंय. पक्षविरोधी काम केल्याचा शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यावरुन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. दरम्यान, शिवाजीकाव आढळराव पाटलांवरची कारवाई मागे घेण्यात आली असून हे शिवसेनेचे मुख्यपत्र असलेल्या सामनातून अनावधानानं बातमी दिल्याची माहिती देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानं पाटील यांच्यावर त्याच्या समर्थकांवर कारवाईचं सत्र सुरू आहे. यापूर्वी देखील शिवसेनेतून अनेकांची हकालपट्टी करण्यात आलीय. एकनाथ शिंदे गटासोबत सामील झाल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरही तशीच कारवाई करण्यात आल्याचं सामनातून वृत्तानुसार बोललं जात होतं. दरम्यान, शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरील कारवाई शिवसेनेकडून मागे घेण्यात आली आहे.

शिंदेंना शुभेच्छा दिल्यानंतर कारवाई

शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यामध्ये त्यांनी ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असं म्हटलं आहे. तसेच या पोस्टमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कुठेही फोटो टाकला नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

कोण आहेत शिवाजीराव आढळराव पाटील?

  1. शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेचे खासदार राहिलेले आहेत.
  2. 2004 साली ते पहिल्यांदा निवडून आले होते.
  3. 2009 आणि 2014 ची लोकसभा निवडणूकही त्यांनी जिंकली होती.
  4. सलग 15 वर्ष ते खासदार राहिले आहेत.
  5. 2019 मध्ये त्यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली होती.
  6. 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला.
  7. शिवाजीराव आढळराव पाटील हे पुणे जिल्ह्यातल्या शिरुर मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात.
  8. शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेल्या अमोल कोल्हेंनी शिरुर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील यांचा पराभव केला होता.

शिवसेनेला गळती, शिंदे गट वाढतोय!

राज्यात एकीकडे शिवसेनेतून वेगळी वाट पकडलेला शिंदे गट वाढत असून दुसरीकडे शिवसेनेत गळतीचं सत्र सुरू झालंय. शिवसेनेत आधी एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांची मोठ्या प्रमाणात हकालपट्टी केल्याचं दिसून आलं. त्यानंतर आता शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांची हकालपट्टी करण्यात करण्यात आली होती. मात्र ती कारवाई मागे घेण्यात आली आहे.

शिवसेनेत हकालपट्टीचं सत्र

शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटानं वेगळं वळण घेतल्यानं सेनेत मोठी फूट पडली आहे. दरम्यान, यामुळे शिवसेनेला फटका बसत असून एकीकडे हकालपट्टी सुरू आहे. तर दुसरीकडे समर्थ शिंदे गटात सामील होत आहे. यामुळे ही फूट वाढतच जात असल्याचं दिसतंय.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....