Special Report | बेळगाव पोटनिवडणूक, वर्षोंवर्षांपासून कानड्यांचा अत्याचार, महाराष्ट्रात सामील होण्यासाठी चाचपडणाऱ्या शेकडो गावांची कहाणी

बेळगावचे नाव घेतले की सीमाप्रश्न आठवतो. अन् सीमाप्रश्नाचे नाव घेतले कि त्या 107 हुतात्मांची आठवण येते (Belgaum by-election 2021 story of marathi peoples)

Special Report | बेळगाव पोटनिवडणूक, वर्षोंवर्षांपासून कानड्यांचा अत्याचार, महाराष्ट्रात सामील होण्यासाठी चाचपडणाऱ्या शेकडो गावांची कहाणी
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 8:50 PM

बेळगाव (कर्नाटक) : बेळगावचे नाव घेतले की सीमाप्रश्न आठवतो. अन् सीमाप्रश्नाचे नाव घेतले कि त्या 107 हुतात्मांची आठवण येते. गेली 60 वर्षे बेळगाव आणि सीमाप्रश्न हा संपूर्ण देशात चर्चेत आहे. मराठी अस्मिता जपत सीमाभागातील 865 गावं आजही महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडत आहेत. कानड्यांचा अत्याचार सहन करत आहेत. तरीही सीमाभागात मराठी भाषिक मराठी धर्म जगत आहे. पण याच मराठी अस्मितेवर कानडी वरवंटा फिरवण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे (Belgaum by-election 2021 story of marathi peoples).

राजकीय पक्षांना मराठी भाषिक दणका देणार का?

सलग चार वेळा बेळगावचे खासदार राहिलेले केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचं निधन झाल्यानंतर बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक होत आहे. 2004 पासून मतदारसंघावर भाजपचीच मक्तेदारी पाहायला मिळाली खरी, पण आता कन्नड संघटनांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय पक्षांना मराठी भाषिक दणका देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांचे कोरोनामुळे निधन

बेळगाव लोकसभेचे दिवंगत खासदार सुरेश अंगडी हे लिंगायत असूनही मराठी भाषिकांमध्ये त्यांचे प्रभुत्व होते. ते 2004 सालापासून तिथले खासदार होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये अंगडी यांना आपल्या मंत्री मंडळामध्ये रेल्वे राज्यमंत्री पद दिले. मात्र, कोरोना संकट काळात दुर्देवी घटना घडली. खासदार सुरेश अंगडी यांना सप्टेंबर 2020 मध्ये कोरोनाची लागण झाली. या आजारामुळे त्यांचे दुर्देवी निधन झाले. त्यामुळे बेळगाव लोकसभेची जागा रिक्त झाली आहे.

बेळगावात पोटनिवडणूक

येत्या 17 एप्रिल रोजी बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून 2 मे या दिवशी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षाने माजी मंत्री दिवगंत सुरेश अंगडी यांच्या पत्नी श्रीमती मंगला सुरेश अंगडी यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसतर्फे माजी मंत्री आणि यमकणमर्डीचे आमदार आणि केपीसीसी कार्याध्यक्ष सतिश जारकिहोळी यांना उमेदवारी दिली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीकडून 26 वर्षीय तरुणाला उमेदवारी

दोन राष्ट्रीय पक्षांव्यतिरीक्त महाराष्ट्र एकिकरण समितीचे 26 वर्षीय उमेदवार शुभम शेळके सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण 8 विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी बैलहोंगल आणि बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. तर उर्वरित 6 मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे येणाऱ्या पोटनिवडणुकीत मराठी भाषिक नेमकं काय करणार? याकडे दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकचंही लक्ष असणार आहे.

भाजपचं पारडं थोडं जड

मंगला अंगडी यांना भाजपाच्या व्होट बँकेसह लिंगायत समाज, जैन आणि काही प्रमाणात मराठा समाजाचा पाठींबा आहे. भाजपाला आरएसएस आणि हिंदूत्ववादी संघटनांचाही पाठिंबा आहे. त्याचबरोबर सहानूभुती आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार, सीएए, एनआरसी, राम मंदिराच्या आणि विकासाच्या मुद्यावर भाजपाला भरघोस पाठिंबा मिळत आहे.

काँग्रेसला दलित आणि मुस्लिम समाजाचा पाठींबा

सतिश जारकिहोळी हे मुळचे गोकाक भागातील असल्याने त्यांना गोकाक आणि अरभावीतील मतदारांसह कन्नड भाषिक तसेच दलित आणि मुस्लिम समाजाचा पाठींबा आहे (Belgaum by-election 2021 story of marathi peoples).

शुभम शेळकेंना मराठी भाषिकांचा पाठींबा

शुभम शेळके यांना बेळगाव ग्रामीण, उत्तर आणि दक्षिण मतदार संघातील मराठा, मराठी भाषिक समाजाचा भक्कम पाठींबा आहे. शुभम शेळके हे युवा समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासमोर भाजपा आणि काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचे करोडपती आणि राजकीय पार्श्वभूमी असलेले उमेदवार आहेत. पण शुभम शेळके या युवकाला मराठा समाजाने भरघोस पाठींबा दिला आहे. तरीही निवडणुकीत मराठी भाषिक कोणाच्या पाठीशी राहणार आणि कानडी अत्याचार, वादग्रस्त झेंडा या सगळ्याचा वचपा काढणार का? हे पाहावं लागणार आहे.

हेही वाचा : Karnataka bypolls : कर्नाटकात 15 जागांसाठी पोटनिवडणूक, भाजपला 8 जागी विजय आवश्यक!

सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.