Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut ED Raid : नवनीत राणा म्हणतात, पापाचा घडा भरला तर फुटतोच, तर कराड म्हणतात, ईडी कारवाईशी भाजपचा संबंध नाही

राऊतांच्या घरावर सकाळी ईडीचे अधिकारी पोहचले आहेत, तेथे अजूनही कारवाई सुरूच आहे. यादरम्यान विरोधकांचे तोंड दाबण्यासाठी भाजपाकडूनच ही कारवाई सुरू असल्याचा आरोप सातत्याने शिवसेनेकडून केला जातोयं.

Sanjay Raut ED Raid : नवनीत राणा म्हणतात, पापाचा घडा भरला तर फुटतोच, तर कराड म्हणतात, ईडी कारवाईशी भाजपचा संबंध नाही
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 10:40 AM

मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरावर आज सकाळी ईडीने धाड टाकल्याने एकच गोंधळ उडालायं. ईडीच्या कारवाईवर राज्यातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास आता सुरूवात झालीयं. यावर आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी आपली प्रतिक्रिया (Reaction) दिलीयं. संजय राऊत यांची चौकशी ईडी मार्फत सुरू आहे. ईडी ही स्वतंत्र यंत्रणा आहे, संजय राऊत यांनी काही चूक केली नसेल तर त्यांनी घाबरण्याचे काही कारण नाही. संजय राऊत यांची चौकशी आणि ईडी याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही, जे कोणी शिवसेनेचे नेते भाजपवर आरोप करत असतील ते चुकीचे आहे त्यांच्या आरोपांचे मी खंडन करतो, असे भागवत कराड म्हटले आहेत.

राऊतांवरील ईडीच्या कारवाईचा आणि भाजपाचा काहीच संबंध नाही

राऊतांच्या घरावर सकाळी ईडीचे अधिकारी पोहचले आहेत, तेथे अजूनही कारवाई सुरूच आहे. यादरम्यान विरोधकांचे तोंड दाबण्यासाठी भाजपाकडूनच ही कारवाई सुरू असल्याचा आरोप सातत्याने शिवसेनेकडून केला जातोयं. यावर आता भागवत कराड यांनी स्वत: स्पष्टीकरण दिले असून माध्यमांशी बोलताना कराड म्हणाले आहेत की, संजय राऊत यांची चौकशी ईडी मार्फत सुरू आहे ईडी ही स्वतंत्र यंत्रणा आहे, संजय राऊत यांनी काही चूक केली नसेल तर त्यांनी घाबरण्याचे काही कारण नाही. संजय राऊत यांची चौकशी आणि ईडी याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही.

हे सुद्धा वाचा

पापाचा घडा भरला की तो फुटतोच नवनीत राणांचे मोठे विधान

यासर्व प्रकरणावर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीही आपली प्रतिक्रिया दिली असून राणा म्हणाल्या की, पापाचा घडा भरला की तो फुटतोच. दरम्यान नवनीत राणा यांनी एक मोठे विधान केले असून त्या म्हणाल्या की, संजय राऊत यांना अटक होणार आहे. संजय राऊत हे 25 कंपनीत भागीदार असल्याचाही गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केलायं. पुढे बोलताना राणा म्हणाल्या की, ही कारवाई यापूर्वीच व्हायला पाहिजे होती. संजय राऊत यांच्या घरावर ईडीने धाड टाकल्याचे कळताच शिवसैनिक राऊतांच्या घराबाहेर जमले असून तेथे ते आंदोलनही करताना दिसत आहेत. शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी करताना देखील दिसत आहेत.

'..बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये', शिंदेंच्या आमदाराचा टोला
'..बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये', शिंदेंच्या आमदाराचा टोला.
ठाकरे बंधूंची युती अन पवार कुटुंबाचं मनोमिलन? शरद पवार स्पष्टच म्हणाले
ठाकरे बंधूंची युती अन पवार कुटुंबाचं मनोमिलन? शरद पवार स्पष्टच म्हणाले.
सूर्यदेव कोपले! चंद्रपूर ठरला देशातला सर्वात हॉट जिल्हा
सूर्यदेव कोपले! चंद्रपूर ठरला देशातला सर्वात हॉट जिल्हा.
वकील अंजानच्या विरोधात ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी रवाना
वकील अंजानच्या विरोधात ग्रामस्थ पोलीस अधीक्षकांच्या भेटीसाठी रवाना.
लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल
लँड स्कॅमचा बादशाह म्हणत शेलारांचा ठाकरेंवर गंभीर आरोप, ऑडिओ व्हायरल.
'..शेवटी रक्ताचं नातं आहे', युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितलं
'..शेवटी रक्ताचं नातं आहे', युगेंद्र पवारांनी स्पष्टच सांगितलं.
खरं सांगायच तर.., थोपटेंचा भाजपात प्रवेश, सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण
खरं सांगायच तर.., थोपटेंचा भाजपात प्रवेश, सांगितलं पक्ष सोडण्याचं कारण.
पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट
पाण्यासाठी दाहीदिशांना भटकंती; राज्यात पाणीटंचाईचं तिव्र सावट.
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्...
काँग्रेसच्या माजी आमदाराचा भाजपात प्रवेश, हाती घेतलं 'कमळ' अन्....
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली
'ही भाजपची भक्ती नव्हे तर...', हिंदी सक्तीवरून मनसे-भाजपात जुंपली.