भंडाऱ्याच्या मोहाडी नगरपंचायतीत नगराध्यक्षपद कुणाकडे? भाजपमध्ये दुफळी, राष्ट्रवादी वेळ साधणार?
भंडाऱ्यातील मोहाडी नगरपंचायतीत भाजपनं (BJP) काँग्रेसची (Congress) सत्ता उलटवली. मात्र,मोहाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा निवडीसाठी भाजपच्या दोन गटात चुरस वाढलीय.
तेजस मोहतुरे, टीव्ही 9 मराठी, भंडारा : राज्यातील 106 नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी नुकतीचं पार पडली. आता नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी सुरु आहेत. भंडाऱ्यातील मोहाडी नगरपंचायतीत भाजपनं (BJP) काँग्रेसची (Congress) सत्ता उलटवली. मात्र,मोहाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा निवडीसाठी भाजपच्या दोन गटात चुरस वाढलीय. भाजपच्या दोन्ही गटांमध्ये राष्ट्रवादी (NCP) वेळ साधण्याची शक्यता असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. 17 फेब्रुवारीला नगराध्यक्ष पदाची निवडणूक होत आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी नगरपंचायतच्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालंय. भाजपच्या गटातटाचा राजकारणामुळे मोहाडी नगरपंचायत वर भाजपचा अध्यक्ष विजयी होईल, मात्र, उपाध्यक्ष उपाध्यक्ष हा भाजपचाच असेल का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मोहाडी नगरपंचायत निवडणुकीत भाजपनं 17 पैकी 9 जागांवर विजय मिळवला होता. यापूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेसला 2 जागांवर विजय मिळवावा लागला.
भाजपमधील गटबाजी विकोपाला
मोहाडी नगरपंचायत निवडणुकीत भाजपला 17 पैकी 9 जागेवर यश आले आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस ला 6 जागांवर यश प्राप्त झाले.तर पाच वर्षा अगोदर एकहाती सत्ता असलेली काँग्रेसला यंदा मात्र 2 जागेवर समाधान मानावे लागले. मोहाडी नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जमाती राखीव जागा असून मोहाडी नगरपंचायतीमध्ये भाजपला बहुमत असताना सुध्दा भाजपच्या अध्यक्ष व अन्य पदासाठी मात्र गटबाजी विकोपाला गेली आहे.
नगराध्यक्ष उपनराध्यक्ष कुणाचा असणार?
मोहाडीमध्ये भाजपचे दोन गट आहेत. एका गटाचे पाच उमेदवार निवडून आले तर दुसऱ्या गटाचे चार उमेदवार निवडून आले.मात्र, दोन गटात समन्वय नसल्याने येणाऱ्या 17 फेब्रुवारीला होणाऱ्या अध्यक्ष पदाचा निवडीसाठी भाजपकडून दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. एका गटातून पुनम धकाते तर दुसऱ्या गटातून छाया डेकाटे यांनी अर्ज दाखल केला आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस मधून वंदना परातेनी अर्ज दाखल केला आहे. मात्र, एकाच पक्षातून दोन अर्ज दाखल झाल्याने अध्यक्ष कोणता गटाचा असणार याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. तर, भाजपचा दुसरा गट राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक असल्याने उपाध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार काय या संदर्भात सुध्दा मोहाडी शहरात चर्चा रंगू लागली आहे.
इतर बातम्या:
IPL 2022 Auction: आयपीएल लिलावाआधीच किंग्ज इलेव्हन पंजाबला मोठा झटका, वसीम जाफर यांनी दिला राजीनामा
Bhandara Mohadi Nagarpanchayat Election BJP divided into two groups NCP may get benefit of this situation