Bharat Gogawale : “तेव्हा लाज वाटली नव्हती का “आदित्य ठाकरे यांच्या विधानाला भरत गोगावले यांचे झणझणीत उत्तर
महाविकास आघाडीशी आमचं जुळतं नाही, त्यामुळे त्यांच्याशी काडीमोड घ्या अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतलं. शिवसेनेच्या आमदारांना घेऊन बंड केलं. गुजरातमध्ये असताना त्यांना शिवसेनेकडून समजवण्याचा प्रयत्न केला.
मुंबई – दहिसर (Dahisar) येथील शिवसैनिकांच्या मेळाव्यांमध्ये भाषण करताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधणा साधला होता. त्यांच्या या विधानाला शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी उत्तर दिले आहे. 2019 च्या निवडणुकीत शिवसेना भाजपने एकत्र निवडणूक लढवली होती. राज्यातील जनतेने या युतीलाच कौल दिला होता. मात्र सेना भाजप न करता आपणच असंघाशी संग करत काँग्रेस राष्ट्रवादी सोबत उभद्र आघाडी केल्याची आठवण करून देत, आम्ही काही चुकीच केल नाही त्यामुळे लाज वाटण्याचा संबध येत नाही असे चोख उत्तर गोगावले यांनी दिले. बाळासाहेबांचं हिंदूत्व आम्ही सोडणार नाही असेही त्यांनी सांगितले. आमदारांनी बंड केल्यापासून त्यांच्यावरती शिवसेनेच्या अनेक नेत्यांकडून टीका केली जात आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी बंडखोर नेत्यांना अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे.
बंडखोर आमदारांना शिवसेनेकडून समजावण्याचा प्रयत्न केला
महाविकास आघाडीशी आमचं जुळतं नाही, त्यामुळे त्यांच्याशी काडीमोड घ्या अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतलं. शिवसेनेच्या आमदारांना घेऊन बंड केलं. गुजरातमध्ये असताना त्यांना शिवसेनेकडून समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांची मनस्थिती भाजपमध्ये जाण्याची असल्याने त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर अटी ठेवल्या. त्या अटी मान्य नसल्याने एकनाथ शिंदे भाजपसोबत जाण्याचं मनात पक्कं केलं. गुजरातमध्ये सुरक्षितता कमी वाटतं असल्याने त्यांचा मुक्काम गुवाहाटीमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हलवण्यात आला आहे.
शिवसेनेच्या तिन्ही नेत्यांकडून जोरदार टीका
शिवसेना फुटल्यापासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कार्यकर्त्यांना एकत्र करण्यासाठी त्यांनी हे नियोजन केलं असल्याची चर्चा आहे. शिंदे गटाच्या आमदारांवरती शिवसेनेच्या तिन्ही नेत्यांकडून टीका केली जात आहे. त्याचबरोबर बंडखोर आमदार देखील त्यांच्या टीकेला उत्तर देत आहेत.