मंत्रिपद तर… भरत गोगावले यांना निधी वाटपात रेड कार्पेट; घसघशीत निधी मिळण्यामागचं कारण काय?

निधी वाटपात भेदभाव झाल्याचं वाचण्यात आलं. आता जो निधी वाटप झाला आहे. त्यात कोणाला किती निधी मिळाला हे अजित पवार यांनी स्पष्ट केलं पाहिजे. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका त्यांनी ठेवली पाहिजे.

मंत्रिपद तर... भरत गोगावले यांना निधी वाटपात रेड कार्पेट; घसघशीत निधी मिळण्यामागचं कारण काय?
Follow us
| Updated on: Jul 24, 2023 | 10:42 AM

मुंबई | 24 जुलै 2023 : अर्थमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अजित पवार यांनी आमदारांना मतदारसंघाच्या विकासासाठी निधी दिला आहे. यात सर्वाधिक निधी राष्ट्रवादीच्या आमदारांना देण्यात आला आहे. तसेच शिंदे गटाच्या आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांनाही निधी दिला आहे. मात्र, या सर्व आमदारांमध्ये भरत गोगावले यांना सर्वाधिक निधी देण्यात आला आहे. गोगावले हे मंत्रिपदाची आस लावून आहेत. त्यांना अजून मंत्रिपद मिळालेलं नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना हा निधी दिल्याचं सांगितलं जात आहे. तसेच गोगावलेंना मंत्रिपद मिळणार नाही म्हणून एवढा प्रचंड निधी दिला आहे काय? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांमध्ये 1500 कोटींच्या निधीची तरतूद केली. अजित पवार यांनी राष्ट्रवादी, शिंदे गटाच्या आमदारांना निधी दिला. शरद पवार यांच्या गटातील काही आमदारांना आणि काँग्रेसच्या काही आमदारांनाही निधी दिला. मात्र, भरत गोगावले यांना भरघोस निधी दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. भरत गोगावले यांना 150 कोटींचा निधी देण्यात आला आहे. मंत्रिपद न मिळाल्याने गोगावले नाराज आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी हा निधी दिल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र, एवढा प्रचंड निधी दिल्यानंतर गोगावले यांना मंत्रिपद मिळणार की नाही? अशी चर्चा आता रंगली आहे. प्रचंड निधी देऊन गोगावले यांना शांत करण्यात आलं आहे का? मंत्रिपद न देण्याचे हे संकेत आहेत का? की निधी देऊन मंत्रिपदही देण्यात येणार आहे, असे अनेक प्रश्न आता चर्चेत आले आहेत.

हे सुद्धा वाचा

अनिल देशमुख यांनाही निधी नाही

दरम्यान, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुख या दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांना निधी देण्यात आलेला नाही. हे दोन्ही नेते शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे आहेत. तरीही त्यांना निधी देण्यात आलेला नाही. मात्र, जयंत पाटील यांना निधी देण्यात आला आहे. जयंत पाटील हे सुद्धा शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे असूनही त्यांना निधी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

एक रुपयाही आला नाही

निधी न मिळाल्याने काँग्रेसचे नेते सुभाष थोटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या मतदारसंघात एकही रुपयाही आला नाही. 2021च्या बजेटमध्ये 80 कोटींचा निधी मिळाला होता. तो सर्व निधी थांबवला गेला. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो. बांधकामाचा निधी हा आम्ही प्रस्तावित करत नाही. कार्यकारी अभियंता ठरवत असतो. माझा राजूरा मतदारसंघ तेलंगणाला लागून आहे. त्यामुळे निधी द्यावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. पण त्यावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही, असं सुभाष थोटे यांनी सांगितलं.

स्थनग प्रस्ताव मांडू

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते अजित पवार यांनी निधी वाटपावरून अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. निधी वाटपात भेदभाव झाल्याचं वाचण्यात आलं. आता जो निधी वाटप झाला आहे. त्यात कोणाला किती निधी मिळाला हे अजित पवार यांनी स्पष्ट केलं पाहिजे. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका त्यांनी ठेवली पाहिजे. तसं नाही झालं तर आम्ही स्थगन प्रस्ताव मांडून त्याला वाचा फोडू, असं सचिन अहिर म्हणाले.

अन्याय नाही

दरम्यान, अर्थ मंत्री अजित पवार निधी वाटपात कुणावरही अन्याय करण्यात आला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. निधी वाटपात कुणावरही अन्याय केला नाही. सर्वच आमदारांना समान निधीचं वाटप करण्यात आलं आहे. विरोधक केवळ आरोप करत आहेत. आरोप तथ्यहिन आहेत, असं अजित पवार म्हणाले.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.