Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारायण राणे असे का बोलतायत? भास्कर जाधव म्हणतात, हा तर सिद्धपुरुषानं दिलेला शाप, वाचा आणखी काय म्हणाले?

भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात अपशब्द वापरला. त्याचे राज्यात पडसाद उमटत आहेत. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनीही राणेंवर टीका केली आहे. (bhaskar jadhav)

नारायण राणे असे का बोलतायत? भास्कर जाधव म्हणतात, हा तर सिद्धपुरुषानं दिलेला शाप, वाचा आणखी काय म्हणाले?
bhaskar jadhav
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 11:31 AM

मुंबई: भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात अपशब्द वापरला. त्याचे राज्यात पडसाद उमटत आहेत. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनीही राणेंवर टीका केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सिद्धपुरुष होते. त्यांनी राणेंना शाप दिला होता. त्यामुळेच राणे काहीही बरळत आहेत, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. (bhaskar jadhav reply narayan rane over comments on cm uddhav thackeray)

भास्कर जाधव यांनी मीडियाशी संवाद साधताना नारायण राणेंवर जोरदार टीका केली आहे. राणे असं का बडबडत आहेत? बाळासाहेब ठाकरे यांनी हयात असताना एका कामासाठी डॉ. जलील पारकर यांना फोन केला होता. पारकर अजून आहेत. त्यांच्या फोनवरूनच शिवसेनाप्रमुखांनी राणेंना दिलेला शाप होता. बाळासाहेब ठाकरे हे सिद्धपुरुष होते. ते जे बोलायचे ते जे भविष्यवाणी करायचे ती खरी व्हायची. बाळासाहेबांचं प्रत्येक वक्तव्य खरं ठरलेलं आहे. राणे केंद्रीय मंत्री होऊ द्या की आणखी काही होऊ द्या, सिद्धपुरुष बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला त्यांना शाप आहे, त्यानुसार राणेंची अधोगती सुरू आहे, असं जाधव म्हणाले.

राणेंना नेस्तानाबूत केल्याशिवाय राहणार नाही

मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलं राणे आणि त्यांचे दोन पुत्र. त्यांना पुत्रं म्हणायचं की आणखी काही म्हणयाचं हे तुम्ही ठरवा. हे तिघेही म्हणजे संपूर्ण कोकणाच्या संस्काराला लागलेला महाकलंक आहे. राणे आणि त्यांच्या मुलांची वक्तव्ये चुकीची आहेत. केंद्रीय मंत्री म्हणूनही राणेचं वक्तव्य संतापजनक आहे. यापूर्वीही त्यांनी घाणेरड्या भाषेत वक्तव्य केली आहेत, असं सांगतानाच राणेंनी कानाखाली मारेल म्हणून सांगितलं… ज्या पद्धतीने शिशुपालाचे शंभर गुन्हे झाले होते. त्याप्रमाणे राणेंचे हे शंभर गुन्हे पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्राची माती, वैचारीक भूमिका राणेंना नेस्तानाबूत केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

राणेंना अटक होऊ शकते

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुलाखत पाहिली. केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्यात येत नाही, असा पाटील यांचा दावा आहे. पण पाटील म्हणतात तशी कायद्यात तरतूद नाही. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहिली त्यापेक्षा तुम्ही वेगळे आहात का? घटनेमध्ये सर्वांना नियम आणि कायदे, हक्क सारखे आहेत. राणे केंद्रीय मंत्री असले तरी त्यांना अटक होऊ शकते, असा दावा जाधव यांनी केला. (bhaskar jadhav reply narayan rane over comments on cm uddhav thackeray)

संबंधित बातम्या:

Narayan Rane : नाशिकमध्ये शिवसैनिकांनी भाजपचं कार्यलय फोडलं, सांगलीत राणेंच्या पोस्टरवर शाईफेक

Narayan Rane : मी नॉर्मल माणूस वाटलो काय? आमचं पण वरती सरकार, बघतोच : नारायण राणे

कॅबिनेट मंत्री असताना राणेंना अटक होऊ शकते का? काय होणार, नाशिकचे पोलीस आयुक्तांचं सविस्तर स्पष्टीकरण

(bhaskar jadhav reply narayan rane over comments on cm uddhav thackeray)

चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या; संतप्त नागरिकांचा मोर्चा
चिमुकलीची लैंगिक अत्याचार करून हत्या; संतप्त नागरिकांचा मोर्चा.
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.