Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा फेसबूकला नवा फोटो येताचं कमेंट्सचा पाऊस, नेटकरी म्हणाले ‘गद्दार’
ख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी सगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती आपला फोटो आणि इतर माहितीत बदल केला आहे. फेसबुकवरती त्यांनी फोटो बदल केल्यानंतर त्यांच्या फोटोला मोठ्या प्रमाणात लाईक मिळाले आहेत.
मुंबई – दहा दिवस महाराष्ट्रात राजकीय नाट्य पाहायला मिळाल्यानंतर त्याचा शेवट अखेर राजभवनात शपथ घेऊन झाला असं म्हणायला हरकत नाही. शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर सरकार कधी कोसळणार असं सगळ्यांना वाटतं होतं. परंतु सरकार कोसळायला दहा दिवस लागले. सुरूवातीला बंड केल्यानंतर काही आमदार शेजारच्या गुजरात (Gujarat) राज्यात होते. त्यानंतर तिथं असुरक्षितता वाटायला लागल्यानंतर त्यांनी त्यांचा मुक्काम गुवाहाटीला (Guwahati) हलवला. त्यानंतर शिवसेनेच्या अनेक आमदारांनी गुवाहाटी गाठलं आणि शिंदे गटाला समर्थन दिलं. हे सगळं राजकीय नाट्य महाराष्ट्रासह देशाने पाहिलं. दोन्ही गटाकडून आरोप-प्रत्यारोप होत राहिले. त्यातून शिंदे गटाच्या मागण्या उद्धव ठाकरेंना मान्य नसल्याने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. दोन दिवसापूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात मंत्री पदाची शपथ घेतली. इथलं राजीनामा नाट्य थांबलं.
फोटो बदलताचं कमेंट्सचा पाऊस
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी सगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती आपला फोटो आणि इतर माहितीत बदल केला आहे. फेसबुकवरती त्यांनी फोटो बदल केल्यानंतर त्यांच्या फोटोला मोठ्या प्रमाणात लाईक मिळाले आहेत. तर त्यांच्यावरती कमेंट्सचा पाऊस पडला आहे. शिंदेच्या समर्थकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी त्यांना अनोख्या पद्धतीच्या शुभेच्छा आणि कमेंट केल्या आहेत. सोशल मीडियावर अशा पद्धतीच्या कमेंट्स अनेकदा पाहायला मिळतात. परंतु शिंदे यांचा गद्दार असल्याच्या कमेंट्स आल्या आहेत. त्याचबरोबर काही नेटकऱ्यांनी त्यांचं भविष्य तिथं थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
अशा कमेंट्स आल्या आहेत
‘CMO MAHARASTRA’ या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत फेसबूक पेजवरती एकनाथ शिंदे यांचा फोटो अपलोड केल्यापासून त्यांच्यावरती कमेंट्सचा वर्षाव होत आहे. आत्तापर्यंत 18 लोकांनी त्यांचा फोटो लाईक केला आहे. तर साधारण तीन हजार लोकांनी त्या फोटोवरती कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी फोटोवरती गद्दार अशा पद्धतीच्या कमेंट्स केल्या आहेत. तर “मा. उद्धवसाहेबांसारख्या सहृदय माणसाला दुःख देऊन कुणी सुखी होऊ शकत नाही”. “आम्ही सदैव सोबत….फक्त मा.उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे”. महाराष्ट्राच्या नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल…एकनाथ संभाजी शिंदे साहेब आपलं अभिनंदन..आपल्या कारकिर्दीत मराठा समाजाचे प्रलंबीत प्रश्न सुटून मराठा समाजातील गोरगरीब आणि अडचणीत असलेल्या घटकाला आपण न्याय द्यायला ही अपेक्षा व आपल्या भावी वाटचालीस शुभेच्छा
अशा पद्धतीच्या कमेंट्स आल्या आहेत.