केसीआर यांचा झाला मोठा ‘गेम’, महाराष्ट्रात एंट्री, पण तेलंगणात मोठा उलटफेर!

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात आपल्या पक्ष वाढविण्यास सुरवात केली आहे. राव यांनी महाराष्ट्रात लक्ष घातले पण त्यांच्या स्वताच्या राज्यात दुर्लक्ष केलं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण...

केसीआर यांचा झाला मोठा 'गेम', महाराष्ट्रात एंट्री, पण तेलंगणात मोठा उलटफेर!
BRS PARTYImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 5:12 PM

सोलापूर : भारत राष्ट्र समिती ( बीआरएस ) पक्षाचे सर्वेसर्वा आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. के. चंद्रशेखर राव हैद्राबादवरून सोलापूरमार्गे ते पंढरपूरला वारी दर्शन घेणार आहेत. केसीआर यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर तसेच पोस्टर्स झळकविण्यात येत आहेत. हायवेवर सर्वत्र बीआरएस त्यांच्या पक्षाचे झेंडे फडकत आहेत. केसीआर यांच्या स्वागतासाठी ‘अब की बार, किसान सरकार’ असे बॅनर झळकत आहेत. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासह त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ महाराष्ट्र येणार असून या निमित्ताने ते महाराष्ट्रात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याची चर्चा होत आहे. मात्र, के. चंद्रशेखर राव महाराष्ट्र जोरदार शक्तिप्रदर्शन करत असतानाच तिकडे तेलंगणात मात्र पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुरेख पुणेकर यांनी नुकताच बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. तर, राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचा मुलगा भगीरथ भालके हे ही बीआरएसच्या वाटेवर आहेत. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत भगीरथ भालके बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत.

हे सुद्धा वाचा

चंद्रशेखर राव यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना त्यांच्या बीआरएस पक्षाचे अनेक बडे नेते, माजी मंत्री, खासदार, आमदार आणि २० हून अधिक महत्वाचे पदाधिकारी आज दिल्ली येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत.

बीआरएसचे माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव, माजी खासदार पोंगुलेती श्रीनिवास रेड्डी, विद्यमान आमदार दामोदर रेड्डी, माजी आमदार गुरुनाथ रेड्डी, तेलंगणातील 5 माजी आमदार, स्थानिक संस्थांच्या पदांवर असलेले 20 इतर महत्त्वाचे नेते यांच्यासह अनेक पदाधिकारी, नेते काँगेसमध्ये प्रवेश करत आहेत.

लोकांचा सामना करू शकत नाही

तेलंगणातील माजी आमदार, AICC सचिव आणि महाराष्ट्र मराठवाडाचे प्रभारी डॉ. एस. ए. संपत कुमार यांनी बीआरएस प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपला आत्मविश्वास गमावला आहे. तेलंगणातील लोकांचा ते सामना करू शकत नाही. म्हणूनच आपल्या पक्षाचा विस्तार करण्यासाठी ते महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत असा टोला लगावला.

जे मुख्यमंत्री आपल्याच राज्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. ते महाराष्ट्राचे भले कसे करणार? इतर राज्यांतील घडामोडींमुळे त्याच्या स्वतःच्या राज्यातील पडझड झाकून टाकता येईल, असा विचार करणे हा निव्वळ मूर्खपणा आहे. तेलंगणामधील बीआरएस सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे. लोकांचा सरकारने गमावला आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेस बीआरएसचा पराभव करेल असेही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.