Maharashtra Election 2024 : मतदानाच्या एकदिवस आधी शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका

Maharashtra Election 2024 : महाराष्ट्रात आता मतदानाला 24 तासापेक्षा कमी कालावधी उरला आहे. निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेनुसार प्रचार तोफा थंडावल्या आहेत. मात्र, तरीही पडद्यामागून राजकीय घडामोडी घडतच आहेत. आता मतदानाच्या एकदिवस आधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका दिला आहे.

Maharashtra Election 2024 : मतदानाच्या एकदिवस आधी शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Follow us
| Updated on: Nov 19, 2024 | 9:45 AM

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता अवघा एक दिवस उरला आहे. उद्या 20 नोव्हेंबरला मतदान आहे. 18 नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजता प्रचार तोफा थंडावल्या. त्यानंतर कल्याण-डोंबिवलीमध्ये एक मोठी घडामोड घडली आहे. मतदानाच्या बरोबर एक दिवस आधी उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कल्याण-डोंबिवली हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. त्याचा फटका ठाकरे गटाला जास्त बसला. कारण या भागातील बहुतांश शिवसैनिक, पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा क्षेत्रातून एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे निवडून आला.

कल्याण-डोंबिवलीमध्ये पुन्हा संघटनात्मक बांधणी भक्कम करण्याचे उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. आता सदानंद थरवळ यांनी साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणं हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का आहे. कारण शिवसेनेत फूट पडल्यानंतर कल्याण-डोंबिवलीत पक्ष संघर्ष करत असताना सदानंद थरवळ ठाकरेंसोबत होते. विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने सदानंद थरवळ यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता.

कट्टर शिवसैनिकाने उद्धव ठाकरेंची सोडली साथ

सदानंद थरवळ यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा झटका आहे. डोंबिवली विधानसभेत महायुतीचे भाजप उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्यासमोर ठाकरे गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. दीपेश म्हात्रे शिवसेना शिंदे गटात होते. ते शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. पण महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपाकडे गेल्याने दीपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश करुन उमेदवारी मिळवली. सदानंद थरवळ हे डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कळवा-मुंब्रा विभागाचे जिल्हाध्यक्ष होते. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या सदानंद थरवळ यांनी दोन वेळा डोंबिवली शहर शाखेचे शहराध्यक्ष पद भूषवलं होतं. त्यांची कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली होती.

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.