Prashant Kishor Arrest : मोठी बातमी, प्रशांत किशोर यांना अटक
Prashant Kishor Arrest : देशातील प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक प्रशांत किशोर यांना अटक झाली आहे. प्रशांत किशोर हे राजकीय रणनितीकार म्हणून सुद्धा ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत देशातील प्रमुख पक्षांसोबत काम केलं आहे. त्यांच्यासाठी रणनितीची आखणी केली आहे.
प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांना सोमवारी पहाटेच्या सुमारास पटना पोलिसांनी ताब्यात घेतलं. बीपीएससी परीक्षा पेपर लीक प्रकरणात कारवाईच्या मागणीसाठी ते अनिश्चितकाळासाठी आमरण उपोषणाला बसले होते. प्रशांत किशोर हे गांधी मुर्ती येथे आमरण उपोषणाला बसले होते. पहाटे चारच्या सुमारास बिहार पोलिसांनी त्यांनी ताब्यात घेतलं. पोलीस त्यांना रुग्णवाहिकेत घालून AIIMS रुग्णालयात घेऊन गेले. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी कुठलेही उपचार करुन घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी रुग्णालयातही आपण उपोषण आंदोलन कायम ठेवलं आहे. पटना पोलीस आणि जन सुराजचे प्रमुख प्रशांत किशोर यांच्या समर्थकांमध्ये एम्सच्या बाहेर झडप झाली.
प्रशांत किशोर हे बिहारचे लोक आणि विद्यार्थ्यांसाठी लढत होते. सरकार या एकतेला घाबरली. त्यांच्याविरोधात शारीरिक हिंसा निंदनीय आहे, असं त्यांच्या समर्थकांच म्हणणं आहे. या झडपेनंतर पोलिसांनी प्रशांत किशोर यांना AIIMS मधून हलवलं आहे. ते त्यांना नौबतपूर येथे घेऊन चालले आहेत. प्रशांत किशोर यांच्या समर्थकांचा गोंधळ पाहून प्रशासनाने हे पाऊल उचललय.
मागणी काय आहे?
गांधी मैदानात जिथे प्रशांत किशोर आपल्या समर्थकांसोबत आंदोलनाला बसले होते, ती जागा पटना पोलिसांनी रिकामी केली आहे. पटना पोलिसांनी गांधी मैदानातून निघणाऱ्या वाहनांची चेकिंग सुद्धा केली. प्रशांत किशोर हे बीपीएससीमधील अनियमिततांविरोधात आमरण उपोषणाला बसले आहेत. 2 जानेवारीला त्यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी आमरण उपोषण सुरु केलं होतं. बिहार लोक सेवा आयोग परीक्षा रद्द करावी, ही त्यांची मागणी आहे.
#WATCH | BPSC protest | Bihar: Patna Police detains Jan Suraaj chief Prashant Kishor who was sitting on an indefinite hunger strike at Gandhi Maidan pic.twitter.com/cOnoM7EGW1
— ANI (@ANI) January 5, 2025
‘राजकारण कधीही होऊ शकतं’
पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी प्रशांत किशोर बीपीएससी अनियमिततांसंदर्भात म्हणाले की, ते 7 जानेवारी हाय कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. त्यांनी राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव यांनाही विरोध करण्याच आवाहन केलं. “तेजस्वी यादव एक मोठे नेते आहेत. ते विरोधी पक्ष नेते आहेत. विरोधी पक्ष या नात्याने माझ्याजागी त्यांनी या आंदोलनाच नेतृत्व करायला पाहिजे होतं. त्यांनी या विरोध प्रदर्शनाच नेतृत्व करावं” असं प्रशांत किशोर म्हणाले. जन सुराजचे संस्थापक म्हणाले की, ‘राजकारण कधीही होऊ शकतं. इथे आमच्या पक्षाचा कुठलाही बॅनर नाहीय’